Published On : Sat, May 30th, 2026
By Nagpur Today Nagpur News

सोनेगाव आमराई तील 61 वृक्षांना वाचविण्यासाठी 61 वरिष्ठ नागरिकांनी केले “चिपको आंदोलन”

# महिलांनी 61 राख्या बांधत 61 दिव्यांनी केले औक्षण..
Advertisement


नागपूर, मे 30: नागपूर महानगर पालिके ने सोनेगाव आमराई जंगलातीलजवळपास 61 वृक्ष (3 ऐतिहासिक व 58 इतर) तोडण्यासाठी उद्यान विभागामार्फत नोटीस जारी केली होती. त्या नोटीसी च्या प्रस्तावाला विरोध तरुण तुर्क आणि पर्यावरणवादी संघटना तर करीत आहेतच पण आता अनुभवी अर्क ( वरिष्ठ नागरिक ) देखील मैदानात उतरले आहे…

आज “सेव सोनेगाव आमराई ग्रुप” अंतर्गत जवळपास 61 वरिष्ठ नागरिकांनी (महिला व पुरुष) सोनेगाव आमराई तील 61 वृक्षांना वाचविण्यासाठी “चिपको आंदोलन” केले…ह्यावेळी वरिष्ठ महिलांनी ह्या झाडांना भाऊ मानत 61 राखी बांधत 61 दिव्यांनी औक्षण सुद्धा केले आणि ह्या वृक्षांना वाचविण्याचा संकल्प देखील केला…


ह्या संदर्भात महापालिकेने येत्या 2 जुन ला जनसुनावणी वृक्ष अधिकारी (मनपा आयुक्त) ह्यांचे कडे ठेवली आहे. त्यात देखील जवळपास 200 च्या वर नागरिकांनी आपले आक्षेप नोंदविले आहेतच.
सोनेगाव आमराई चे जंगल (ओल्ड एअरपोर्ट रोड अर्थात जुना सोनेगाव विमानतळ रस्ता च्या आजूबाजूचे भोसले कालीन घनदाट जंगल), मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर् विधान सभा क्षेत्रातील ह्या वरिष्ठ
नागरिकांसाठी कित्येक वर्षांपासून (त्यांच्या बाल पणापासून) ) सर्वात फेव्हरेट मॉर्निग वॉक रोड तर आहेच पण . राजे रघुजी भोसले च्या काळात बनलेले सुरेख श्रीकृष्ण मंदिर आणि आतमध्ये असलेले हनुमान मंदिर ह्यावर आस्था आणि जवळच असलेले 300 वर्षापेक्षा जुने मोठे वडा चे झाड आणि भोंसलेकालीन विहीर ह्यावर ह्या वरिष्ठ नागरिकांचे प्रेम आणि मैत्री ची नाते आहे.


नागपूर महानगर पालिकेच्या मनपा नोटीस प्रमाणे सहकार नगर घाट ते मुळीक कॉम्प्लेक्स येथील भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या जागेतून (आमराई जंगल चा भाग) मलवाहीका टाकण्याच्या बांधकामात् आणि खोदकामात ही 61 वृक्ष अडथळा निर्माण करीत आहेत . ज्यात बाभूळ,हिवार ,काट सावर ,महारुख ,बोराची झाडे आडजात , सुबाभूळ, कडुलिंब , चिंच बिलाई , करंज , अशोका , बेल निलगिरी , पळस , जांभूळ आणि वडाचे झाड (मनपा नोटीसेप्रमाणे ह्या पैकी फक्त 3:हेरिटेज आणि 58 नॉन हेरिटेज झाडे आहेत.)


वरिष्ठ नागरिक म्हणतात वृक्ष तोडण्याच्या ह्या बाबतीत मनपा ला घाई किती आहे बघा. आक्षेप आणि जन् सुनावणी च्या आधीच कंत्राट दराने पाईप आणून बाजूला स्टोर करून ठेवले आहेत ह्या सर्व पर्यावरणवादी महिला व पुरुष वरिष्ठ नागरिकांनी ह्या वृक्ष कटाईचा विरोध दर्शवीत मनपा ने ह्या मलवाहिनीचा मार्ग बदलावा आणि मलवहिनी बाजूच्या नाल्यातून (पोहरा नदीतून) टाकवी जेणेकरून झाडांना काही होणार नही अशी एकमुखाने मागणी केली आहे.

Advertisement

काही वरिष्ठ नागरिक जे पक्षी प्रेमी आहेत ते म्हणतात ह्या भागात नीर निराळे पक्षी , स्थलातरीत पक्षी तसेच मोरांचे नियमित दर्शन होते. ही बृक्ष कटाई त्या पक्ष्यांना देखील प्रभावित करेल. तेव्हा मनपा ना निर्णयाचा फेरवीचार करावा आणि प्रस्तावाला रद्द करण्याचा निर्णय घ्यावा.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.