Published On : Fri, Oct 6th, 2017

महावितरणकडून ६०० वितरण पेट्यांची देखभाल-दुरुस्ती

Advertisement

नागपूर: वीज ग्राहकांना चांगला आणि दर्जेदार वीज पुरवठा मिळावा म्हणून महावितरणकडून नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील ६०० वितरण पेटयांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली.

एक जनमित्र एक वितरण पेटी हे संकल्पना समोर ठेऊन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रफिक शेख यांनी नागपूर आणि वर्धा जिल्हयातील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वितरण पेट्यांची देखभाल दुरुस्ती व्हावी म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला. वितरण पेट्यांच्या सभोवताल भागाची स्वछता, रोहित्रातील तेल बदलणे, स्टे वायर मजबूत करणे आदी कामाचा यात प्रामुख्याने समावेश होता.

नागपूर शहर मंडळ कार्यालयातील काँग्रेस नगर विभागात ४९, बुटीबोरी विभागात ८०, सावनेर विभागात१३७, काटोल विभागात१२३,मौदा विभागात १०३, नागपूर ग्रामीण विभागात १०२ वितरण पेट्यांची देखभाल आणि दुरुस्ती करण्यात आली. सार्वजनिक ठिकाणी म्हणजे शाळा, कॉलेज, रुंग्णालये या ठिकाणी असलेल्या वितरण पेट्यांची दुरुस्ती केल्या गेली.

अधीक्षक अभियंता सर्वश्री मनीष वाठ, नारायण आमझरे ,कार्यकारी अभियंता कुंदन भिसे, प्रफुल लांडे, स्वप्नील गोतमारे ,दिलीप घाटोळ, डी.एन .साळी यांनी मेहनत घेतली.