Published On : Sat, Jun 2nd, 2018

नागपूरात घरमालक वृद्धाचा चिमुकलीवर अत्याचार

Advertisement

Rape
नागपूर: वृद्ध घरमालकाने भाडेकरूच्या चिमुकलीवर (वय ८ वर्षे) अत्याचार केला. पाप उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ मे च्या मध्यरात्री ही घटना घडली. रतन दोडगूजी नागदेवे (वय ६०) असे आरोपीचे नाव असून, शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याला अटक केली.

नागदेवे हा आधी बीअर बारमध्ये वेटर म्हणून काम करायचा. सध्या तो घरीच राहतो. त्याला तीन तरुण मुले आहेत. एकाचे लग्न झाले असून, त्याला पीडित चिमुकलीच्या वयाची नात आहे. आरोपी रतन नागदेवेचे घरी पाच वर्षांपासून पीडित मुलीचा परिवार भाड्याने राहतो. आईवडील दोघेही रोजमजुरीचे काम करतात. गेल्या काही दिवसांपासून आरोपी रतन नागदेवे पीडित मुलीला रात्री बेरात्री घरात बोलवून तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. १८ मे च्या मध्यरात्री त्याने पीडित मुलीला स्वत:च्या खोलीत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तुझ्या आईवडिलांना याबाबत सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशी धमकीही दिली. घाबरलेली मुलगी गप्प बसली. तिने खाणेपिणेही सोडले. बरेच दिवसांपासून मुलीच्या या अवस्थेकडे दुर्लक्ष झाल्यानंतर शुक्रवारी तिच्या आईने तिला जवळ घेऊन विचारणा केली असता तिने या संतापजनक प्रकाराची आईला माहिती दिली. आईने मुलीच्या वडिलांना सांगितले. त्यानंतर अजनी ठाण्यात तक्रार नोंदवली. चौकशीअंती आरोपीविरुद्ध बलात्काराचे कलम ३७६ (२) तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी लगेच आरोपी रतन नागदेवेला ताब्यात घेऊन अटक केली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement