Published On : Tue, Feb 6th, 2018

महाराष्ट्राच्या रेल्वेविकासासाठी ६ हजार ६५८ कोटी

Advertisement

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील रेल्वे विकास कामांसाठी वर्ष २०१८-१९ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात ६ हजार ६५८ कोटींची तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यासाठी करण्यात आलेली ही सर्वात मोठी आर्थिक तरतूद असल्याचे रेल्वे मंत्रालयाने आज जाहीर केले आहे.

रेल्वे मंत्रालयाने आज ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे. यानुसार २००९ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्रातील रेल्वे विकासासाठी प्रतीवर्षी अर्थसंकल्पात सरासरी १ हजार १७१ कोटींची तरतूद करण्यात आली असून या तुलनेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी ६ हजार ६५८ कोटींची तरतूद असून ती ४६८ टक्के जास्त असल्याचे म्हटले आहे.

Gold Rate
09 May 2025
Gold 24 KT 96,800/-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 96,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज्यातील नवीन रेल्वे प्रकल्पांची घोषणा
यावर्षीच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी नव्याने प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. यात इगतपुरी-मनमाड दरम्यान १२४ कि.मी. चा तिसरा रेल्वे मार्ग सुरू करणे आणि १ हजार ८६० कोटीं खर्चाच्या एका रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरण कामाचा समावेश आहे. यासह मुंबई उपनगरीय रेल्वेच्या बळकटीकरणासाठी येथील ९० कि.मी. रेल्वे मार्गाचे दुपरीकरण करणे आणि १५० कि.मी. अतिरीक्त रेल्वे मार्गासाठी ५१ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याचे म्हटले आहे.

राज्यात ३६ प्रकल्पांचे काम सुरु
राज्यात सध्या ५९ हजार ६२४ कोटी खर्चाच्या आणि एकूण ५ हजार ९७६ कि.मी. रेल्वे मार्गांचा समावेश असलेल्या ३६ रेल्वे प्रकल्पांचे काम सुरु असल्याचे या ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Advertisement
Advertisement