Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Sep 23rd, 2020

  कोव्हिड रुग्णांसाठी शहरातील ५३ रुग्णालये सेवेत

  मनपाच्या प्रयत्नाने ३४३६ बेड्स उपलब्ध

  बेड्सच्या उपलब्धतेसाठी केन्द्रीय नियंत्रण कक्ष क्रमांक ०७१२ – २५६७०२१ वर संपर्क करा

  नागपूर : शहरातील वाढती कोरोनाबाधितांची संख्या आणि गरज असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध न होणे, या तक्रारींवर नागपूर महानगरपालिकेने आवश्यक कार्यवाही करीत शहरातील एकूण ५३ रुग्णालये नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून दिली आहे. या ५३ रुग्णालयांमध्ये ६ शासकीय आणि ४७ खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये १५१४ आणि खाजगी रुग्णालयांमध्ये १९२२ बेड्स असे एकूण ३४३६ बेड्स शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी उपलब्ध झाले आहेत. या सर्व ५३ रुग्णालयांमध्ये कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरू असून येथे बेड्सच्या उपलब्धतेनुसार अतिजोखमीच्या रुग्णांना भरती केले जात आहे.

  शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांच्या सुविधेकरिता नागपूर महानगरपालिकेच्या प्रयत्नाने महापौर संदीप जोशी यांच्या मार्गदर्शनात आणि आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या नेतृत्वात अनेक महत्वाचे कार्य करण्यात आले आहेत. कोरोबाधित रुग्णांना रुग्णालयांमधील बेड्सची वर्तमानस्थिती लक्षात यावी यासाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांक जारी करण्यात आला आहे. ०७१२ – २५६७०२१ या क्रमांकावर फोन करून रुग्णांना शहरातील रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता जाणून घेता येत आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी केंद्रीय नियंत्रण कक्ष क्रमांकाच्या १० लाईन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. नागरिकांना गरजेच्या वेळी अचूक माहिती मिळावी, त्यांची भटकंती होउ नये यासाठी मनपातर्फे ‘डॅशबोर्ड’ सुद्धा तयार करण्यात आले असून यामध्ये सर्व खाजगी रुग्णालयांद्वारे त्यांच्याकडील बेड्सची ‘रियल टाईम’ माहिती अपडेट केली जाते. खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना येणा-या अडचणी सोडविण्यासाठी प्रत्येक खाजगी रुग्णालयांमध्ये एक ‘कोरोना मित्र’ नियुक्त करण्यात आले आहेत. खाजगी रुग्णालयांसंदर्भात कुठलिही तक्रार नागरिकांना असल्याची त्याची माहिती त्वरीत ‘कोरोना मित्रा’ला देण्यात यावी, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.

  प्रत्येक झोनमध्ये ५ रुग्णवाहिका
  कोव्हिड संदर्भात नागरिकांना जलद प्रतिसाद मिळून त्यांना सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी मनपातर्फे कार्यवाही करण्यात आली आहे. त्याद्वारे झोनस्तरावर यंत्रणा बळकट करण्याचे कार्य करण्यात आले. अतिजोखमीच्या कोरोनाबाधित रुग्णाला जलद उपचार घेता यावे यासाठी त्याच्या जवळच्या भागातून रुग्णवाहिका उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी झोनस्तरावर उपाययोजना करण्यात आल्या आहे. मनपाद्वारे एकूण ६५ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली असून त्यामधून प्रत्येक झोनला प्रत्येकी ५ रुग्णवाहिका उपलब्ध करण्यात आल्या आहे. यासाठी झोनस्तरावर नियंत्रण कक्षही स्थापित करण्यात आले आहे.

  झोनस्तरावर नियंत्रण कक्ष
  कोरोनावर प्रभावी नियंत्रण करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेद्वारे क्षेत्रीय स्तरावर कोव्हिड नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. कोरोनासाठी अधिकच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी व पर्यवेक्षणासाठी संबंधित झोनचे सहाय्यक आयुक्तांना कोव्हिड नियंत्रण कक्षाचे नोडल ऑफिसर नियुक्त केले आहे. गृह विलगीकरणात असलेल्या किंवा अतिजोखमीच्या रुग्णांना कोणताही त्रास होत असल्यास नागरिकांनी त्वरीत संबंधित झोनच्या नियंत्रण कक्षामध्ये संपर्क साधावे.

   

  झोनस्तरीय कोरोना नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक

  अ.क्र.झोन कार्यालयाचे नावसंपर्क क्रमांक
  लक्ष्मीनगर झोन क्र.०१0712 – 2245053
  धरमपेठ झोन क्र.०२0712 – 2567056
  हनुमाननगर झोन क्र.०३0712 – 2755589
  धंतोली झोन क्र.०४0712 – 2465599
  नेहरुनगर झोन क्र.०५0712 – 2702126
  गांधीबाग झोन क्र.०६0712 – 2739832
  सतरंजीपूरा झोन क्र.०७मो.नं.7030577650
  लकडगंज झोन क्र.०८0712 – 2737599
  आशीनगर झोन क्र.०९0712 – 2655605
  १०मंगळवारी झोन क्र.१०0712 – 2599905
  ११केंद्रीय नियंत्रण कक्ष0712 – 2567021


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145