Published On : Mon, Jul 20th, 2020

उत्तर नागपुरातील ५० जणांनी केला भाजपा पक्ष प्रवेश

ॲड. धर्मपाल मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती : भाजपा दक्षिण भारतीय आघाडी चे यश

नागपूर : शहरातील उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील प्रभाग २ अंतर्गत सुनील कचवारे यांच्यासह ५० जणांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेश सचिव तथा मनपाचे विधी समिती सभापती ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश समारंभ पार पडला.

भारतीय जनता पार्टी दक्षिण भारतीय आघाडी (साऊथ इंडियन सेल) महाराष्ट्र सह समन्वयक पी.एस.एन.मूर्ती, अध्यक्ष शिबू के. नायर, नागपूर शहर कार्यकारी अध्यक्ष संदीप पिल्लई यांच्या नेतृत्वात ५० जणांनी भाजपा दक्षिण भारतीय आघाडीचा झेंडा हातात घेतला.

याप्रसंगी विनोद नायडू, गणेश मंतापूरवार, अमित मुदलियार, पी.टी.शर्मा, के.सुरीबाबु आदी भाजपा दक्षिण भारतीय आघाडी चे पदाधिकारी उपस्थित होते.