Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Wed, Aug 30th, 2017

  मुंबईत रेड अलर्ट: 9 तासांत 12 इंच पाऊस, 5 जणांचा मृत्यू, आज शाळा-महाविद्यालयांना सुटी

  मुंबई: मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पावसाचे पाणी तुंबले आहे. मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल ट्रेन सेवा मंगळवारी दुपारी 12 वाजेपासून ठप्प आहे. दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांना मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. विक्रोळी आणि ठाण्यात दोघ घरे कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

  विक्रोळीत 3 तर ठाण्यात दोघांचा मृत्यू…
  – विक्रोळीतील डोंगराळ भागातील सूर्य नगर येथे पावसामुळे एक घर दुसर्‍या घरावर कोसळले. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला. त्याला एका बालकाचा समावेश आहे.
  – ठाण्यात मुसळधार पावसाने एका महिलेसह तिच्या बालकाचा बळी घेतला आहे.

  LIVE UPDATES…
  – लोकल वाहतूक अत्यंत धीम्या गतीने
  – लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर
  – कुर्ला रेल्वे स्टेशनवर हजारो प्रवाशी अडकले
  – पश्चिम मुंबईत पुन्हा जोरदार पाऊस सुरु
  – हर्बर लाईनवर सीएसटीहून पनवेलसाठी पहिली लोकल ट्रेन 9 वाजून 3 मिन‍िटाला रवाना.
  – बंद पडलेल्या गाड्यांमध्ये सायन ब्रिजवर वाहतुकीची कोंडी

  लोकल वाहतूक हळूहळू पूर्वपदावर…
  – मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी लोकल सेवा काल दुपारी 12 वाजेपासून ठप्प होती. बुधवारी सकाळपासून ती हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
  – हर्बरलाईनवर सीएसटीहून पनवेलसाठी सकाळी 9 वाजून 3 मिनिटाला पहिली लोकल सोडण्यात आली. अद्याप मध्य रेल्वेची एकही गाडी सोडण्यात आलेली नाही.
  – सायन, कुर्ला, चूनाभट्टी, माटुंगा सेंट्रल, ठाणे, मुलुंडसह अनेक रेल्वे स्टेशनवर हजारो प्रवाशी अडकले आहे. आरपीएफ पथकाने अनेकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले.

  रेड अलर्ट जारी…
  हवामान विभागाने मुंबईसह परिसरात पुढील 48 तासात जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शहरात बुधवारी रेड अलर्ट जारी केला आहे. आज शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्‍यात आली आहे. मुंबईकरांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

  दरम्यान, सोमवारी रात्रीपासूनच मुंबई शहर, उपनगर, ठाण्यात मुसळधार पाऊस आहे. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर थोडा कमी असताना चाकरमाने घराबाहेर पडले. मात्र दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली संपूर्ण शहर जलमय झाले. लोकलचे तिन्ही मार्ग बंद पडले, रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे बस, टॅक्सी सेवाही ठप्प झाली. समुद्रालाही माेठे उधाण अाले हाेते. साेसाट्याच्या वाऱ्यामुळे लाटा उंचावत हाेत्या. परिणामी पावसाच्या पाण्याचा निचरा हाेऊ शकला नाही. परिस्थितीचे गांभीर्य अाेळखून सर्व कार्यालये दुपारी 2.30 नंतर साेडून देण्यात अाली. मात्र वाहतूक सेवाच ठप्प असल्यामुळे स्थानकांवर एकच ताेबा गर्दी झाली. सुमारे 30 हजार कर्मचारी अडकून पडले हाेते. विविध संघटना, गणेश मंडळांनी त्यांना मदत केली. दरम्यान, मुंबईतील शाळांना बुधवारी सुटी देण्यात अाली तर पाऊस सुरू राहिल्यास शासकीय कर्मचाऱ्यांना अनुपस्थित राहण्याची मुभा देण्यात अाली.

  26/7 नंतर सर्वात माेठा पाऊस
  26 जुलै 2005 च्या महाप्रलयाची अाठवण काल (मंगळवारी) मुंबईकरांना अाली. दिवसभराच्या मुसळधार पावसाने शहरवासीयांची दाणादाण उडाली. अवघे शहर जलमय झाले. तासांत 300 मिमी म्हणजेच सुमारे फूट विक्रमी 1 पावसाची नाेंद झाली. दुसरीकडे, वाशिंदजवळ ट्रॅकवर दरड काेसळल्याचे पाहून चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने नागपूर- मुंबई दुरांताेचे इंजिन नऊ डबे रुळांवरून घसरले. या दाेन्ही घटनांमुळे मुंबईकडे जाणारी रस्ते रेल्वे वाहतूक दिवसभर ठप्प झाली हाेती.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145