Published On : Mon, Aug 24th, 2020

तालुक्यात निघाले ५ कोरोंना रुग्ण

Advertisement

– आसोली येथिल ३ शितलवाडी येथील मुलगी तर कांद्री येथील महिला पॉझिटिव्ह,एकूण रुग्ण संख्या पोहचली 103 वर

रामटेक : रामटेक तालुक्यात एकूण 5 कोविड 19 पॉझिटिव्ह रुग्ण निघाले. असोली 3,कान्द्री1,शितलावडी1 आजपर्यंत प्रगतीपर कोविड19 रुग्ण संख्या नगरपरिषद रामटेक48,ग्रामीण 55 असे एकूण 103 रुग्ण असे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी सांगितले.

रामटेक तालुक्यातील असोली मध्ये कोरोना पेशंटच्या संपर्कात आलेल् तीन जण कोरोणा पॉझिटिव्ह. प्राप्त माहितीनुसार हे तीन ही रुग्ण आधी आलेल्या कोरोना पेशंट च्या संपर्कात आले होते. त्यात एक आजीबाई 65 वर्ष एक 16 वर्षाची मुलगी आणि एक 3 वर्षाचा माणूस आहे.
आणि हे लोक किती लोकांच्या संपर्कात आले होते हेही शोध सुरू आहे असे .

असे भंडारबोडी आरोग्य केंद्राचे वैदकिय अधिकारी मरकाम यांनी सांगितले.

कांद्री येथील 50 वर्षीय महिला तिला प्रकृती मधे काही त्रास होता तर ती कामठी हॉस्पिटल ला गेली असता तिथे तिची चाचणी करण्यात आली व ती महिला पॉझिटिव्ह आढळली.

शितलवाडी इश्र्वरनगर येथील 28 वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह आढळली सदर मुलगी ही रामटेक येथील हॉस्पिटल मधे गेली असता तिथे त्या मुलीची चाचणी करण्यात आली असता ती मुलगी पॉझिटिव्ह आढळली.

अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र मनसर चे प्रभारी वैदाकीय अधिकारी डॉ.विवेक अनंतवार यांनी दिली.

तसेच 22 ऑगस्ट ला नगरधन येथील पाच संक्रमित जनच्या परिवारातील त्या महिलेची ६२ वर्षीय वृध्द आई निघाली कोरोना संक्रमित.ती वृध्द महीला कोरोना टेस्ट ला नकार होत्या पण त्या हाय रीस्क मधील असल्यामुळें ते कोविड केंद्रात भरती होत्या. त्यांचे ऑपरेशन देखील असल्यामुळें त्यांची टेस्ट आज घेतली असता त्या आज .पॉझिटिव्ह निघाले असल्याचे माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र चे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्मिता
काकडे यांनी दिली.

तहसीलदार बाळासाहेब मस्के, पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर, तालुका वैद्यकीय अधिकारी चेतन नाईकवार, तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रकाश उजगरे. तसेच वैदिकिय अधिकारी विवेक अनंत्वार ,सरपंच परमानंद शेंडे हे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.