Published On : Sun, Apr 28th, 2024

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३.०१ टक्के मतदान

Advertisement

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसऱ्या टप्प्यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशीम, हिंगोली, नांदेड परभणी या जिल्ह्यात मतदान होणार आहे.

यंदाची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी दोघांसाठीही प्रतिष्ठेची असल्याने आता मतदार कोणाला निवडतात हे पाहावे लागणार आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ मतदार संघात दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४३.०१ टक्के मतदान झाले आहे.
एकूण ८ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी:-

वर्धा – ४५.९५ टक्के अकोला -४२.६९ टक्के अमरावती – ४३.७६ टक्के बुलढाणा – ४१.६६ टक्के हिंगोली – ४०.५० टक्केनांदेड – ४२.४२ टक्के परभणी -४४.४९ टक्केयवतमाळ – वाशिम -४२.५५ टक्के मतदान पार पडले.