Published On : Sat, Jun 30th, 2018

मनपातील ४० सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या सेवेतून आज शनिवारी (३० जून) निवृत्त झालेल्या विविध विभागातील ४० कर्मचाऱ्यांचा सत्कार मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात करण्यात आला.

सत्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निगम अधीक्षक राजन काळे, सहायक अधीक्षक (भविष्य निर्वाह निधी) दत्तात्रय डहाके, सहायक अधीक्षक (सामान्य प्रशासन विभाग) मनोज कर्णिक, सहायक अधीक्षक सुषमा ढोरे, डोमाजी भडंग, अजय माटे, प्रकाश सहारे, किशोर तिडके, दिलीप देवगडे प्रामुख्याने उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मान्यवरांनी शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे आणि भविष्य निर्वाह निधीचा धनादेश देऊन सत्कार केला. सत्कारमूर्तींमध्ये राजस्व निरीक्षक एस. ए. जाधव, उच्च श्रेणी लिपिक एम. एस. टाकतोडे, श्रीमती के. एम. चराटे, कनिष्ठ लिपिक एच. एच. बेले, बशीर खान लाल खान पठाण, आर.जी. इंगोले, एम.एस.डब्ल्यू. अल्ताफ खान वजीर खान, हवालदार मीर अबीद अली उस्मान अली, मालवाहक जमादार एस. एल. होले, ए.एन.एम. श्रीमती जी. एस. डगवार, चालक बी.डी. रामटेके, एम.एस. डब्ल्यू. आर. दुबे, मुख्याध्यापक श्रीमती सुनिता पहापळकर, श्रीमती प्रेरणा मुलकुलवार, श्रीमती खिलहत जहाँ अहमद खान, सहायक शिक्षिका श्रीमती रेखा शेंडे, सहायक शिक्षिका श्रीमती नंदा वालदे, श्रीमती खुर्शीद बेगम अन्सारी उर्फ आसीफ अख्तर, श्रीमती अशरफी रहमतुलिसा, चपराशी अशोक सरोदे, श्रीमती उषा गोखे, एस.पी. आसरे, मजदूर श्रीमती तारा धुपे, गजानन गभने, जगदीश उईके, हॅन्ड्रंट कुली केवल खोटे, क्षेत्र कर्मचारी अब्दुल सलीम शेख इसराल, प्रेमदास बावणे, रेजा श्रीमती सुशीला दरवाडे, मजदूर मदन शाहू, चपराशी मनोहर मेंढे, अब्दुल रफिक रहीम बक्स, रमन निमगडे, श्रीमती आशा रामटेके, अटेंडंट उमेश पत्रे, सफाई कामगार श्रीमती लक्ष्मी तांबे, सुरेश बक्सरे, जगन शेंडे, श्रीमती शकून गैतेल यांचा समावेश होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन आणि आभार प्रदर्शन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले.