Published On : Wed, Jun 27th, 2018

कन्हान गोळीबारातील चार आरोपींना अटक

Advertisement

कन्हान : शहरात अवैध धंदयाच्या वरचस्वा करिता गॅंगवांर भडकुन दोन गटांचा आमना – सामना झाल्याने काडया, चाकू , गुप्ती, तलवार व देशी कट्टायाने गोळीबार करण्यात आला ज्यात तीन गंभीर जखमी झाले. या गोळीबाराच्या घटनेने कन्हान पिपरी शहरात दहशत पसरली आहे .

हा भयावह प्रकार मंगळवार दिनांक २६ जून रोजी रात्री ८.४५ ते ९ वाजता दरम्यान पिपरी रोडवरील अशोक नगर चर्ज जवळ घडला. यात अमर उर्फ गब्बर भारत सोनटक्के वय २८ वर्ष मु. पिपरी, रोहन श्याम खरे वय २४ वर्ष पाटील लेआऊट गहुहिवरा कन्हान, व शुभम राजन खोब्रागडे वय २२ वर्ष मु पिपरी यांना गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेऊन दोघांना नागपूर रूग्णालयात हलवण्यात आले.

Advertisement
Advertisement

यावेळी शुभम खोब्रागडे कामा वरून घरी परत येत असताना एका टोळीतील आरोपीने शुभम खोब्रागडे याचा पाठलाग करीत उजव्या बाजूला चाकु मारला यात तो गंभीर जखमी झाला . घटनेची माहीती पोलीस स्टेशन ला मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे , पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, घटना स्थळी पोहचुन तपास सुरू केला .

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे ,अतिरीक्त पोलीस अधिक्षक मोनिका राऊत, गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नागपूर ग्रामीण पथकाचे पोलीस सहाय्यक निरिक्षक अनिल राऊत, ए एस आय लक्ष्मीकांत दुबे, नाना राऊत, सुरज परमार, निलेश बर्वे, शैलेश यादव, प्रणय बनापार, साहेबराव बहाडे , फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट व पोलीस सहकर्यासह घटनास्थळी दाखल होऊन रात्री उशीरा पर्यंत आरोपीचा शोध घेऊन अशोक नगर ला लागुन कोयला खदानच्या टेकडीवरील असलेल कृत्रिम जलसाठा जवळील जंगलात दळून बसलेल्या आरोपीना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.

मूख्य आरोपी गौरव राजेश माहतो वय १९ वर्ष याचा जवळ जीवंत काळतूस व गावठी कट्टा आढळला.तसेच ललीत परीहार वय २६ वर्ष ,मंगेश टेकाम वय २३ वर्ष, श्रृषभ हावरे वय १९ वर्ष सर्व राहणार पिपरी यांचा कडून एक गुप्ती, दोन चाकू ताब्यात घेण्यात आले. नागपूर ग्रामीण एल सी बी पथकानी रात्री शोध मोहीम राबवून बारा तासाचा आत ताब्यात घेऊन कन्हान पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी कन्हान पोलीस स्टेशन ला भेट देऊन अतिरीक्त पोलीस अधिक्षक मोनिका राऊत यांचा मार्गदशना खाली आरोपी विरूध्द कलम ३०७, ३४, १४३, १४४, १४७, १४९ भादंवि व आर्म अँक्ट ३/२५, सामुहिक हमला १३५ नुसार गुन्हा नोंदविला असुन आरोपी संबधीत अधीक पुढील तपास सूरू आहे.

शहरात अवैध धंदयाच्या वरचस्वा करिता तीन चार दिवसा पासुन सुरू असलेल्या वादविवादावर वेळीच दखल घेण्यात न आल्याने ही गोळीबाराची घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांत चर्चा आहे .

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement