Published On : Wed, Jul 31st, 2019

महावितरणच्या “पेमेंट वॉलेट” साठी विदर्भातून ६६८ अर्ज

Advertisement

नागपूर: वीज ग्राहकांना देयकाची रक्कम भरणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी महावितरणकडून सुरु करण्यात आलेल्या “पेमेंट वॉलेट” या सुविधेसाठी महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातून तब्बल ६६८ जणांनी अर्ज केले आहेत. आवश्यक असलेल्या अटी आणि शर्तीची पूर्तता केल्यावर या व्यक्ती अथवा संस्थांना पेमेंट वॉलेटच्या माध्यमातून महावितरणकडून वीज देयक वसुलीची परवानगी देण्यात येणार आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, विदर्भातून सर्वाधिक 105 अर्ज यवतमाळ जिल्ह्यातून आले आहेत. नागपूर ग्रामीण मंडलातून ५४, शहर मंडलातून ७ तर भंडारा जिल्ह्यातून ८६, बुलढाणा जिल्ह्यातून ८४, गोंदिया जिल्ह्यातून ५६ जणांनी या महावितरण “पेमेंट वॉलेट” साठी अर्ज केले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते काही दिवसापूर्वी राज्यातील वीज ग्राहकांसाठी “पेमेंट वॉलेट” या सुविधेचे उदघाटन करण्यात आले होते. महावितरण “पेमेंट वॉलेट” सुविधा घेणाऱ्या व्यक्तीला महावितरणकडून प्रति ग्राहक ५ रुपये कमिशन देण्यात येणार आहे. वीज ग्राहकांसाठी हि सुविधा सुरु केल्याने शहरी भागासह ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना वीज देयकाची रक्कम भरण्यासाठी होणारी पायपीट वाचणार आहे. गावातील “पेमेंट वॉलेट”असलेल्या व्यक्तीकडून गामीण भागातील वीज ग्राहक देयकाची रक्कम भरू शकतात.

Gold Rate
07 july 2025
Gold 24 KT 96,800 /-
Gold 22 KT 90,000/-
Silver/Kg 1,07,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

संपुर्ण पारदर्शक असलेल्या महावितरण पेमेंट वॉलेट योजनेत सहभागी होण्यास इच्छूक असलेल्या व्यक्तींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, व्यापारी असल्यास जिएसटी क्रमांक, दुकान नोंदणी क्रमांक, राहिवासी असल्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, रद्द केलेला धनादेश आदी कागदपत्रे महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर असलेल्या लिंकवर अपलोड करावयाचे आहेत. महावितरणकडे अर्ज प्राप्त झाल्यावर उपविभागीय कार्यालयाकडून पडताळणी करण्यात येणार आहे. आलेले सर्व अर्ज मुंबई मुख्य कार्यालयाकडे पाठवल्या जाणार असून तेथून अर्जाला मंजुरी मिळणार आहे. अर्जदाराला सर्व माहिती त्याने नमूद केलेल्या ई-मेल आणि नोंदणी केलेल्या मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून मिळणार आहे. यासाठी अर्जदारास महावितरणच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही.

एकदा अर्जदारास पेमेंट वॉलेटच्या द्वारे पैसे स्वीकारण्याची परवानगी मिळाली कि सुरवातीस किमान ५ हजार रुपयांचे डेबिट, क्रेडिट कार्ड, मोबाईल बँकींगच्या माध्यमातून टॉप अप करावे लागणार आहे. वॉलेटधारक महावितरण मोबाईल अँपमध्ये नोंदणी करून वीज ग्राहकांच्या देयकाची रक्कम स्वीकारू शकतील. वॉलेटच्या माध्यमातून देयकाचा भरणा केल्यावर वीज ग्राहकास महावितरणकडे नोंदणी केलेल्या मोबाईल वर पैसे भरल्याचा संदेश मिळणार आहे. कोणतीही सज्ञान व्यक्ती, दुकानदार, व्यापारी, वीज मीटर रिडींग करणारी संस्था, महिला बचत गट महावितरणचे वॉलेटधारक होऊ शकतात. महिना अखेरीस कमिशन अर्जदाराच्या वॉलेटमध्ये जमा होईल. महावितरण पेमेंट वॉलेटमुळे ग्रामीण भागात युवकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामुळे अधिकाधिक व्यक्तींनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement