Published On : Tue, Jan 25th, 2022

‘पेंच-२ जलशुद्धीकरण केंद्राचे ३६-तासांचे शटडाऊन

Advertisement

जाने. २७- सकाळी १० ते जाने. २८ -रात्री १० पर्यंत
पश्चिम आणि दक्षिण पश्चिम नागपूर: धरमपेठ झोन , लक्ष्मी नगर झोन , हनुमान नगर झोन , आणि मंगळवारी झोन्समधील 20 जलकुंभाचा पाणीपुरवठा ३६ तास राहणार बाधित
३६ तास शटडाऊन दरम्यान व नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा देखील बंद राहणार..

 

नागपूर, २३ जानेवारी २०२२ , : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी पेंच-२ जलशुद्धीकरण केंद्र  येथे ३.३ के वि विद्यत पॅनल लावण्याकरिता तसेच सेमिनरी हिल्स स्थित महाजलकुंभावर ते पांडे ले आउट मुख्य जलवाहिनीवर, जुना सलुईस वॉल बदलून १००० मी मी चा  व्यासाचा नवीन बटरफ्लाय वॉल लावणे तसेच सेमिनरी हिल्स जलकुंभावर ४ मुख्य आंतर जोडणी करण्याकरिता ३६ तासांचे पेंच-२ जलशुद्धीकरण केंद्राचे शटडाऊन- जानेवारी २७ (गुरुवार ) सकाळी १० ते जानेवारी २८ (शुक्रवार) रात्री १० वाजेपर्यंत घेण्याचे ठरविले आहे .

या ३६ तासाच्या पेंच-२ जलशुद्धीकरण केंद्र शटडाऊन दरम्यान करण्यात येणारी कामे

१) पेंच-२ जलशुद्धीकरण केंद्र  येथे ३.३ के वि विद्युत पॅनल लावणे .

२) सेमिनरी हिल्स स्थित महाजलकुंभावर ते पांडे ले आउट मुख्य जलवाहिनीवर १००० मी मी चा नवीन बटरफ्लाय लावणे

३) सेमिनरी हिल्स जलकुंभावर ४ ठिकाणी मुख्य जलवाहिनी वर आंतर जोडणी करणे

या ३६ तासाच्या पेंच-२ जलशुद्धीकरण केंद्र शटडाऊन कामांमुळे धरमपेठ झोन ,लक्ष्मी नगर झोन : हनुमान नगर झोन: मंगळवारी झोन: असे पश्चिम, दक्षिण-पश्चिम नागपुरातील जवळपास 20 जलकुंभ संपूर्णपणे बाधित राहणार आहे.

तसेच शटडाऊन मधील तांत्रिक काम संपल्यावर जानेवारी २८ (शुक्रवार ) ला रात्री १० वाजे नंतर पाणी पुरवठा सुरु होणार आहे .

ह्या ३६ तासांच्या शटडाऊन कालावधी दरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे. 

 

पेंच -२ जलशुद्धीकरण केंद्र शटडाऊन दरम्यान बाधित राहणारे 22 जलकुंभ :

धरमपेठ झोन: सेमिनरी हिल्स जलकुंभ , सेमिनरी हिल्स (GSR) जलकुंभ , रामनगर जलकुंभ, रायफल लाईन , फुटाळा लाईन, सिविल लाईन DT , IBM DT, राम नगर ग्राउंड जलकुंभ

( Bulk ग्राहक : MES, MECL, WCL, Govt Milk Scheme, Gondwana Club, IG Bunglow, Governor House, CPWD, Postal Colony etc)

लक्ष्मी नगर झोन : गायत्री नगर जलकुंभ, प्रतापनगर जलकुंभ, खामला (पांडे-ले-आउट) जलकुंभ, त्रिमूर्ती नगर जलकुंभ, टाकळी सिम जलकुंभ, जयताळा जलकुंभ आणि लक्ष्मी नगर (नवीन) जलकुंभ , लक्ष्मी नगर (जुने) जलकुंभ.

हनुमान नगर झोन: चिंचभवन जलकुंभ आणि चिंचभवन नासुप्र जलकुंभ

मंगळवारी झोन: गिट्टीखदान जलकुंभ,

 

यादरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे. 

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.