| | Contact: 8407908145 |
  Published On : Fri, Aug 7th, 2020

  कामठी तालुक्यात आज 3 मृत्यूसह 31 रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह

  कामठी :-कामठी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढीवर असून आज दाल ओली कामठी येथील 70 वर्षोय पुरुष, न्यू येरखेडा येथील 65 वर्षीय पुरुष तसेच रमा नगर कामठी येथील 42 वर्षीय महिलेचा कोरोनाबधित होऊन मृत्यू झाल्याचो घटना घडली असून यानुसार आज 3 मृत्यूसह 31 रुग्ण कोरोना पोजिटिव्ह आढळले यानुसार कामठी तालुक्यात आजपावेतो एकूण 862 रुग्ण कोरोना बाधित आढळले त्यातील 437 रुग्णांनी कोरोनावर मात करून उपचार घेत बरे झाले आहेत यानुसार सध्यस्थीतीत कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही 394 आहे.

  आज आलेल्या कोरोना पोजिटिव्ह अहवालानुसार 31 रुग्ण कोरोनाबधित आढळले ज्यामध्ये गुमथळा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत ग्रामीण भागात 4, आजनी 03, कोळसाटाल , गवळीपूरा, छावणी परिषद कामठी प्रत्येकी 01, जुनी खलाशी लाईन कामठी 05, जे एन रोड , नागेश्वर नगर बिडगाव प्रत्येकी 01, न्यू येरखेडा 02, पेरकीपुरा कामठी 01, मोदी पडाव04, यादव नगर 01, येरखेडा 07, रमा नगर , रविदास नगर, लुम्बिनी नगर , संजय नगर प्रत्येकी 01 रुग्णाचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना शासकोय रुग्णालयात हलविण्याची प्रक्रियेला गती देण्यात आली आहे.

  Trending In Nagpur
  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145