Published On : Wed, Jun 16th, 2021

भोसलेवाडी लष्करिबागेत ३०० सफाई कामगारांचा सत्कार

– प्रभाग ७ मध्ये भोसलेवाडी लष्करीबागेत राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा.

नागपुर – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राज ठाकरेच्या ५३ व्या जन्मदिवसा निमित्त उत्तर नागपूरात प्रभाग ७ मध्ये भोसलेवाडी लष्करीबाग परिसरात, महाराष्ट्र नवनिर्माण विध्यार्थी सेनेचे नागपुर जिल्हा अध्यक्ष दिनेश इलमेंनी प्रभागातील सफाई कर्मचारी, वीज पुरवठा कर्मचारी, कचरा गाडी चालक व कर्मचारी, पाणी पुरवठा कर्मचारी, शव वाहिनी कर्मचारी ज्यांनी कोरोना काळात अथक मेहनत करत शहरासाठी आपले प्राण पणाला लावून काम केले अश्या ३०० लोकांचे प्रोत्साहन वाढावे ह्या दृष्टीकोणातून सत्कार करण्यात आले. तसेच N -95 मास्क , सेनेटाइजर, व अल्पोपहार देण्यात आले.

यावेळी प्रामुख्याने मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी, दिनेश इलमे नागपूर जिल्हा अध्यक्ष, शहराध्यक्ष अजय ढोके, श्याम पुनियनी, सतीश कोल्हे, उमेश बोरकर, आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी कार्यक्रमाचे आयोजन दिनेश इलमे मनवीसे नागपुर जिल्हा अध्यक्ष आणि मनोज काहलकर मनवीसे उत्तर नागपुर अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.