| | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, May 9th, 2017

  नयना पुजारी बलात्कार, हत्या प्रकरणी तीन नराधमांना फाशीची शिक्षा

  Nayana-Pujari-case
  पुणे:
  अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तीनही दोषींना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी हा निर्णय दिला. या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने मंगळवारी दुपारी हा निर्णय दिला. दरम्यान, सोमवारी झालेल्या सुनावनीत न्यायालयाने या तीनही आरोपींना दोषी ठरविण्यात आले होते. दोषी आरोपींवर अपहरण, जबरी चोरी, सामूहिक बलात्कार, हत्या, मृताच्या शरिरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा गुन्ह्यांखाली दोषी ठरवण्यात आले. तर माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

  योगेश अशोक राऊत (वय 32, रा. मु.पो. गोळेगाव, ता. खेड), महेश बाळासाहेब ठाकूर (वय 31, रा. सोळू, ता. खेड), विश्‍वास हिंदूराव कदम (वय 34, रा. हनुमंत सुपर माकर्रेटजवळ, दिघीगांव, मूळ, भुरकवडी, ता. खटाव, जि. सातारा) या तिघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. तर, राजेश पांडुरंग चौधरी (वय 31, रा. मु.पो. गोळेगाव, ता. खेड), असे माफीच्या साक्षीदाराचे नाव आहे. राजेश चौधरीची मुक्तता करण्यात आली आहे.

  कोण होती नयना पुजारी?
  नयना पुजारी (वय 28) ही खराडी येथील सेनीक्रॉन प्रायव्हेट लिमीटेड या सॉफ्टवेअर कंपनीत संगणक अभियंता होती. 7 एप्रिल 2009 या दिवशी नयना नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयातील काम आटोपून रात्री 8 च्या सुमारास घरी निघाली. घरी जाण्यासाठी ती खराडी येथील रिलायन्स मार्टजवळील लक्ष्मी हॉस्पिटलजवळील बस स्टॉपवर बसची बाट पहात थांबली होती. दरम्यान, या प्रकरणातील दोषी आरोपी इंडिका कारमधून (एम.एच. 14, बी.ए. 2952) नयनाजवळ आले. त्यांनी नयनाली प्रवासी म्हणून गाडीत घेतले. तसेच, हडपसर येथे सोडतो असे सांगितले. प्रत्यक्षात मात्र, आरोपींनी नयनाला वाघोली, तुळापूर, जरेवाडी (ता. खेड) येथे नेले. तेथे तिच्यावर सामुहीक बलात्कार करत हत्या केली.

  या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणन हर्षद निंबाळकर यांनी काम पाहिले. तर, आरोपींच्या वतीने बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. बी.ए.आलुर, अ‍ॅड. रणजित ढोमसे-पाटील आणि अ‍ॅड. अंकुश जाधव काम पाहिले. या खटल्यासात अ‍ॅड. निबाळकर यांनी एकूण 37 साक्षीदार तपासले आहेत. बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. आलुर यांनी 13 साक्षीदार तपासले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145