नागपूर. श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या वतीने हिंगणा तालुक्यातील झिल्पी तलाव मोहगाव येथे दोन वर्षांपूर्वी श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराची स्थापना करण्यात आली. आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराच्या दोन वर्ष पूर्तीनिमित्ताने रविवारी 11 फेब्रुवारी रोजी द्वितीय वर्धापन दिनाचा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
फेब्रुवारी 2022 मध्ये हिंगणा तालुक्यातील मोहगाव येथील झिल्पी तलावाच्या काठावर निसर्गरम्य परिसरात श्री सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या स्थापना दिनाच्या अनुषंगाने रविवारी (ता.11) मंदिरात सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत श्रीगणेश याग होणार आहे. यानंतर सकाळी 11.30 ते दुपारी 2 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री सिद्धिविनायक मंदिराच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित श्रीगणेश याग आणि भव्य महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन माजी महापौर, मा. उपमुख्यमंत्री यांचे मानद सचिव आणि श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री संदीप जोशी यांनी केले आहे.