Published On : Wed, Aug 21st, 2019

सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायद्यातर्गंत 290 व्यक्तींना झाला दंड

नागपूर : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायद्यांतर्गंत 2018- 2019 या दरम्यान 290 व्यक्ंतीवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून 54 हजार 760 रूपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमासंबंधी जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या आजच्या बैठकीत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पातुरकर यांनी ही माहिती दिली. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते.

Advertisement

एप्रिल ते जुलै महिन्याच्या अखेर 43 व्यक्तींवर 5410 रुपयांची दंड आकारणी करण्यात आली असून पाच तंबाखू मुक्ती समुपदेशन कक्षाव्दारे एप्रिल ते जुलै 2019 मध्ये 271 रूग्णांना समुपदेशन करण्यात आले. तर त्यापैकी 31 रूग्ण व्यसनातून मुक्त झाले. समूह चर्चा कार्यक्रमात साधारणत: 40 व्यकतींशी व्यसनमुक्तीसंदर्भात चर्चा झाली.

Advertisement

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 70 शाळा तंबाखूमुक्त असल्याची माहिती सदस्य सचिवांनी दिली. मौखिक आरोग्य तपासणी मोहीम देखील राबविण्यात येत असून लवकरच तालुकास्तरीय समन्वय समीती गठीत करण्यात येणार आहे.

बैठकीला अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग, स्वयंसेवी संघटनांचे प्रतिनिधी व अन्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement