Published On : Thu, Sep 14th, 2017

शहरातील २८ बेरोजगार अभियंताना महावितरणची कामे

नागपूर: महावितरण नागपूर शहर मंडल कार्यालयाच्या वतीने विदुयत शाखेतील बेरोजगार पदवी आणि पदविका धारक २८ युवकांना जिल्हा नियोजन योजतनेतील २ कोटी ८१ लक्ष रुपयांची कामे लॉटरी पद्धतीने देण्यात आली.

नागपूर शहर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता श्री. मनीष वाठ यांच्या अध्यक्षतेखाली गड्डीगोदाम येथील कार्यालयात आयोजित कार्य्रक्रमात शहरातील बेरोजगार युवकांना लॉटरी पद्धतीने कामाचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री. वाठ यांनी, कामाचा दर्जा चांगला ठेऊन ,अपघात विरहित कामे करायचे आवाहन युवकांना केले. काँग्रेस नगर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. कुंदन भिसे यांनी मोजमाप पुस्तक कसे भरायचे याची माहिती दिली.

राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री. नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विदुयत शाखेतील बेरोजगार पदवी आणि पदविका धारकांना एका वेळी १० लाखाची कामे निविदा न काढता लॉटरी पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री नामदार श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक बेरोजगारांना मागील ३ वर्षात कोट्यवधींची कामे मिळाली आहेत. कार्यक्रमास बुटीबोरी विभागाचे कार्यकारी अभियंता श्री दिलीप घाटोळ उपस्थित होते.