Published On : Sun, Sep 27th, 2020

भंडारा जिल्ह्यातआज 277 कोरोना पॉझिटिव्ह

आज 71 रूग्णांना डिस्चार्ज
· पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 4950
· बरे झालेले रुग्ण 2959
· क्रियाशील रुग्ण 1888
· आज 02 मृत्यू
·एकूण मृत्यू 103

भंडारा : जिल्ह्यात आज 277 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून आज 71 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2959 झाली असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 4950 झाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 151, साकोली 24, लाखांदूर 07, तुमसर 22, मोहाडी 26, पवनी 26 व लाखनी तालुक्यातील 21 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 2959 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 4950 झाली असून 1888 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 103 झाली आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 2590, साकोली – 344, लाखांदुर- 211, तुमसर- 467, मोहाडी- 474, पवनी- 405 व लाखनी- 459 असे एकूण 4950 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 2959 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 60 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02 टक्के एवढा आहे.

आज 27 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 180 व्यक्ती भरती असून 2081 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.