| | Contact: 8407908145 |
  Published On : Sun, Feb 4th, 2018

  भंडारा जिल्हा मराठी पत्रकार भवनासाठी २५ लाखांचा निधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

  भंडारा:- भंडारा जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वास्तूसाठी २५ लाख रुपयांचा निधी शासनातर्फे देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. पत्रकार भवन येथे आयोजित आरोग्य शिबीर व पत्रकार संघाच्या संकेतस्थळ उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार परिणय फुके, ॲड.रामचंद्र अवसरे, चरण वाघमारे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन भैरम, उपाध्यक्ष राकेश चेटुले, सचिव मिलींद हळवे व पत्रकार उपस्थित होते.

  पत्रकार संघाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, पत्रकारांना आव्हांनाचा सामना करावा लागतो. पत्रकारांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी शासनाने विविध योजना तयार केल्या आहेत. पत्रकार हल्ला विरोधी कायदा, घरकुल योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना आदींचा यात समावेश आहे.

  पत्रकार भवनाच्या इमारत बांधकामासाठी २५ लाखांचा निधी शासन देईल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष चेतन भैरम यांनी केले. संचालन बबन मेश्राम यांनी केले तर आभार डी.एफ. कोचे यांनी मानले.

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145