Published On : Tue, Dec 5th, 2017

मेयोला ऊर्जाबचतीसाठी महाऊर्जा तर्फे 25 लाख

Advertisement

Bawankule
नागपूर: इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेयो रूग्णालयात ऊर्जाबचतीसाठी 25 लाख रूपयांचे अनुदान महाऊर्जातर्फे देण्यात आले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते 25 लाख रूपयांचा धनादेश सोमवारी (मेयो) रूग्णालयाच्या व्यवस्थापनाच्या सुपूर्द करण्यात आला.

मेयो इस्पितळला येणारे प्रचंड वीज बिल ऊर्जाबचतीच्या माध्यमातून कमी करण्याची सूचना ऊर्जा मंत्र्यांनी याप्रसंगी केली. यावेळी झालेल्या बैठकीत ऊर्जा बचतीबद्दल चर्चा करण्यात आली. जुने लाईट बदलवून एलईडी लाईट लावा. जुने पंखे बलवून कमी वीज लागणारे नवीन पंखे बसवा. रूग्णालयात वीज बचत करणारे फाईव्ह स्टार उपकरण लावण्यात यावे. विजेचे उपरकणे खरेदी करताना वीज बचत करणारे उपकरण घेण्यास प्राधान्य द्यावे, असेही ऊर्जा मंत्री म्हणाले.

Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement
Advertisement
 

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement