Published On : Thu, Jul 21st, 2022
By Nagpur Today Nagpur News

२४ तासाचे शटडाऊन: ‘श्री नगर’ जलकुंभावरील पाणीपुरवठा २२ रोजी राहणार बंद

Advertisement

हनुमान नगर झोन
टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा होणार नाही

नागपूर : नागपूर महानगर पालिका आणि OCW हनुमान नगर झोन ह्यांनी नरेंद्र नगर भागात जवळपास ३ आंतर जोडणी आणि एक वाल्व लावण्या करीता श्री नगर जलकुंभाचा २४ तास शटडाऊन येत्या दि २२ जुलै , २०२२ (शुक्रवार) रोजी घेतलेला आहे. ह्या शटडाऊन दरम्यान नरेंद्र नगर चौकात ५०० x ५०० मी मी व्यासाच्या जलवाहिनी वर १ तसेच ५०० x २५० जलवाहिनी वर दोन ठिकाणी आंतरजोडणी आणि २५० मी मी व्यासाच्या जलवाहिनीवर नवीन वाल्व लावण्यात येणार आहे

Gold Rate
Thursday 13 March 2025
Gold 24 KT 87,100 /-
Gold 22 KT 81,000 /-
Silver / Kg 99,100 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या शटडाऊन कामामुळे श्री नगर (हनुमान नगर झोन) चा पाणीपुरवठा शुक्रवार , २२ जुलै २०२२ रोजी बाधित राहनार

या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा बाधित राहणारे भाग पुढीलप्रमाणे:
श्री नगर जलकुंभ: श्री नगर, सुंदरबन, ८५प्लॉट, सुयोग नगर, साकेत नगर, अरविंद सोसायटी, बोरकुटे लेआऊट, PMG सोसायटी, विजयानंद सोसायटी, संताजी सोसायटी, डोबी नगर, म्हाडा कॉलोनी, नरेंद्र नगर, शिल्पा सोसायटी, जय दुर्गा सोसायटी -१, नगर विकास, सर्वत्र नगर, जोगी नगर, भीम नगर, नगर, कुशी नगर, पार्वती नगर, हावरपेठ, द्वारकापुरी, रामेश्वरी रोड , मधुबन ले आउट, सप्तगिरी नगर आणि इतर परिसर .

अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.

Advertisement
Advertisement