Published On : Tue, Jun 9th, 2020

राष्ट्रवादीचा २१ वा वर्धापन दिन १० जूनला;राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन

वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला शरद पवारसाहेब फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार…

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुपारी २ वाजता फेसबुक लाईव्ह माध्यमांतून कार्यकर्त्यांना संबोधित करणार…

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बुधवार दि. १० जून २०२० रोजी २२ वा स्थापना दिवस आणि २१ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत असून यानिमित्ताने राज्यभर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची व संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला फेसबुकच्या माध्यमातून व्हिडिओद्वारे सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.तर दिनांक ९ जून २०२० रोजी सायंकाळी ५ वाजता शरद पवार यांच्या फेसबुक पेजवरून हा व्हिडीओ प्रसारित होणार आहे.

पक्षाचा वर्धापन दिन सकाळी १०.१० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व जिल्हा मुख्यालयातील कार्यालयात जेवढे आवश्यक असतील तेवढ्याच लोकप्रतिनिधींनी / पदाधिकारी/ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत फिझिकल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून ध्वजारोहण करावे असे आवाहनही या परिपत्रकात करण्यात आले आहे.

तसेच यावर्षी आलेल्या कोरोना संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन न करता प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिनांक ४ जून २०२० रोजीच्या जारी केलेल्या परिपत्रकातील आवाहनानुसार जिल्हा व तालुका स्तरावर सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत रक्तदान शिबिरे आयोजित करावीत व सदर रक्तदान शिबीर कार्यक्रमात पक्षाचे लोकप्रतिनिधी, सर्व पदाधिकारी, फ्रंटल व सेलचे प्रमुख व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे असेही या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात आले आहे.

दिनांक १० जून २०२० रोजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दुपारी २ वाजता फेसबुक लाईव्ह माध्यमांतून सर्व कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. या मध्येही आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी केले आहे.