Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Tue, Mar 23rd, 2021

  मास्क बनविण्याच्या माध्यमातुन 200 महिला बचत गटांना मिळाला रोजगार

  कामठी :-शहर अभियान व्यवस्थापन कक्ष ‘उडाण शहर स्तर संघ’ द्वारे महिला सबलीकरणाचे स्तुत्य उपक्रम सुरू आहे यानुसार कामठी नगर परिषद च्या महिला बचत गटांना दिनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत लाभ उपलब्ध करून दिला जात असून शहरातील 200 महिला बचत गटांना मास्क बनविण्याच्या माध्यमातून एक उत्तम रोजगार प्राप्त झाला आहे तर शासनाने दिलेल्या या उद्योगातून महिला बचत गटातील सदस्य भगिनी शिवणकाम करून 20 हजार मास्क तयार करून 4लक्ष रुपयाचे आर्थिक उत्पन्न मिळविनार आहेत.महाराष्ट्र्राज्यातील 36जिल्ह्यातून पंधरा जिल्ह्यातील लोकसंख्या व बचतगटांच्या सदस्य संख्येच्या आधारे कामठी नगर परिषद ची निवड करण्यात आली असुन कोविड च्या पाश्वरभूमीवर कामठी नगर परिषद ला 20 हजार मास्क बनिविण्याचे काम शासनाने दिले आहे त्या अनुषंगाने शहर अभियान व्यवस्थापन कक्ष, ‘ऊडाण शहर स्तर संघ ‘ च्या माध्यमातून 200 महिला बचत गट च्या भगिनी ह्या शिवनकलेच्या माध्यमातून युद्धपातळीवर मास्क बनवीत आहेत.

  कामठी नगर परिषद च्या नोंदणीकृत महिला बचत गटांना योग्य मार्गदर्शन व योग्य सहकार्य मिळत असल्याने एक ना एक असे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.बचत गट हे महिलांच्या आर्थिक बचतीचे माध्यम राहिले नसून ते आता संघटित होऊन आत्मनिर्भर व सक्षमीकरणाकडे भरारी घेत आहेत.कुटुंबाची जवाबदारी पार पाडून महिलांच्या सुप्तगुणांचा उपयोग व्हावा व आर्थिक उन्नती सोबत सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बचत गट भाग्यश्री ठरत आहेत.त्यानुसार कामठी नगर परिषद ने देखील नोंदणीकृत बचत गटांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन , प्रशिक्षण, कला गुणांचा जगासमोर प्रदर्शन करणाऱ्या अनेक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिले आहेत.

  शहर अभियान व्यवस्थापन कक्ष ‘उडाण शहर स्तर संघ’ द्वारे कामठी शहरात महिला सबलीकरणाचे स्तुत्य उपक्रम सुरू आहेत .यानुसार शासनाने कामठी नगर परिषद ची केलेल्या निवडीनुसार 20 हजार मास्क बनविण्याचे काम कामठी नगर परिषद ला दिले आहे.ज्यामुळे कामठी नगर परिषद चे नोंदणीकृत 200 महिला बचत गट च्या भगिनी उत्कृष्ट सुती कापडाचा वापर करून ज्यामध्ये सूक्ष्म धूलिकरण व पाण्याचे बिंदू आरपार होणार नाही असे शिलाई काम करून मास्क बनविण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत.तर या कामातून 4 लक्ष रुपयाचे आर्थिक उत्पन्न या बचत गटांना मिळणार आहे. मास्क बनविणाऱ्या या महिलांनी कोविड च्या पाश्वरभूमीवर बचत गटाकडून चार दिवसाचे प्रशिक्षण घेऊन दर्जेदार 20 हजार मास्क बनविण्याचे काम सुरू केले आहे.तरया सुप्त उपक्रमासाठी कामठी शहरातील बचत गटाच्या शेकडो महिला सदस्यांना मोलाचा रोजगार मिळाला आहे.अशा अनेक रोजगाराच्या माध्यमासाठी कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारो संदीप बोरकर, प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप तांबे व विशाल गजभिये हे सतत प्रयत्नशील असतात.सरकारी योजनांची अंमलबजावणी व प्रत्यक्षात महिला सबलीकरनाचे उत्कृष्ट कार्य हे कामठी शहरातील महिला बचत गट कडून होत असल्याचे सद्यस्थितीत सुरू असलेले मास्क बनविण्याचे शिवणकाम हे एक उत्तम उदाहरण आहे.

  शासनाने दिलेले 20 हजार मास्क बनविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शहर अभियान व्यवस्थापन कक्ष सह उडान शहर स्तर संघ च्या 200 महिला बचत गट कार्यरत असून यामध्ये उडाण शहर स्तर संघ च्या अध्यक्षा माधुरिताई गजभिये, तसेच आम्रपाली तांबे, करुणा गजभिये, कमलेश्वरी मेश्राम, कामिनी गोंडाने, वर्षा पाटील, विशाखा गेडाम, रुपाली गभने, जकीरा बानो, राजेश्री बन्सोड आदींसह वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष यांचा मोलाचा वाटा आहे.

  मास्क बनविण्याच्या माध्यमातुन 200 महिला बचत गटांना मिळाला रोजगार
  कामठी ता प्र 23:-शहर अभियान व्यवस्थापन कक्ष ‘उडाण शहर स्तर संघ’ द्वारे महिला सबलीकरणाचे स्तुत्य उपक्रम सुरू आहे यानुसार कामठी नगर परिषद च्या महिला बचत गटांना दिनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत लाभ उपलब्ध करून दिला जात असून शहरातील 200 महिला बचत गटांना मास्क बनविण्याच्या माध्यमातून एक उत्तम रोजगार प्राप्त झाला आहे तर शासनाने दिलेल्या या उद्योगातून महिला बचत गटातील सदस्य भगिनी शिवणकाम करून 20 हजार मास्क तयार करून 4लक्ष रुपयाचे आर्थिक उत्पन्न मिळविनार आहेत.महाराष्ट्र्राज्यातील 36जिल्ह्यातून पंधरा जिल्ह्यातील लोकसंख्या व बचतगटांच्या सदस्य संख्येच्या आधारे कामठी नगर परिषद ची निवड करण्यात आली असुन कोविड च्या पाश्वरभूमीवर कामठी नगर परिषद ला 20 हजार मास्क बनिविण्याचे काम शासनाने दिले आहे त्या अनुषंगाने शहर अभियान व्यवस्थापन कक्ष, ‘ऊडाण शहर स्तर संघ ‘ च्या माध्यमातून 200 महिला बचत गट च्या भगिनी ह्या शिवनकलेच्या माध्यमातून युद्धपातळीवर मास्क बनवीत आहेत.

  कामठी नगर परिषद च्या नोंदणीकृत महिला बचत गटांना योग्य मार्गदर्शन व योग्य सहकार्य मिळत असल्याने एक ना एक असे अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.बचत गट हे महिलांच्या आर्थिक बचतीचे माध्यम राहिले नसून ते आता संघटित होऊन आत्मनिर्भर व सक्षमीकरणाकडे भरारी घेत आहेत.कुटुंबाची जवाबदारी पार पाडून महिलांच्या सुप्तगुणांचा उपयोग व्हावा व आर्थिक उन्नती सोबत सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बचत गट भाग्यश्री ठरत आहेत.त्यानुसार कामठी नगर परिषद ने देखील नोंदणीकृत बचत गटांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन , प्रशिक्षण, कला गुणांचा जगासमोर प्रदर्शन करणाऱ्या अनेक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिले आहेत.

  शहर अभियान व्यवस्थापन कक्ष ‘उडाण शहर स्तर संघ’ द्वारे कामठी शहरात महिला सबलीकरणाचे स्तुत्य उपक्रम सुरू आहेत .यानुसार शासनाने कामठी नगर परिषद ची केलेल्या निवडीनुसार 20 हजार मास्क बनविण्याचे काम कामठी नगर परिषद ला दिले आहे.ज्यामुळे कामठी नगर परिषद चे नोंदणीकृत 200 महिला बचत गट च्या भगिनी उत्कृष्ट सुती कापडाचा वापर करून ज्यामध्ये सूक्ष्म धूलिकरण व पाण्याचे बिंदू आरपार होणार नाही असे शिलाई काम करून मास्क बनविण्याचे काम युद्धपातळीवर करीत आहेत.तर या कामातून 4 लक्ष रुपयाचे आर्थिक उत्पन्न या बचत गटांना मिळणार आहे. मास्क बनविणाऱ्या या महिलांनी कोविड च्या पाश्वरभूमीवर बचत गटाकडून चार दिवसाचे प्रशिक्षण घेऊन दर्जेदार 20 हजार मास्क बनविण्याचे काम सुरू केले आहे.तरया सुप्त उपक्रमासाठी कामठी शहरातील बचत गटाच्या शेकडो महिला सदस्यांना मोलाचा रोजगार मिळाला आहे.अशा अनेक रोजगाराच्या माध्यमासाठी कामठी नगर परिषद चे मुख्याधिकारो संदीप बोरकर, प्रकल्प व्यवस्थापक प्रदीप तांबे व विशाल गजभिये हे सतत प्रयत्नशील असतात.सरकारी योजनांची अंमलबजावणी व प्रत्यक्षात महिला सबलीकरनाचे उत्कृष्ट कार्य हे कामठी शहरातील महिला बचत गट कडून होत असल्याचे सद्यस्थितीत सुरू असलेले मास्क बनविण्याचे शिवणकाम हे एक उत्तम उदाहरण आहे.

  शासनाने दिलेले 20 हजार मास्क बनविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शहर अभियान व्यवस्थापन कक्ष सह उडान शहर स्तर संघ च्या 200 महिला बचत गट कार्यरत असून यामध्ये उडाण शहर स्तर संघ च्या अध्यक्षा माधुरिताई गजभिये, तसेच आम्रपाली तांबे, करुणा गजभिये, कमलेश्वरी मेश्राम, कामिनी गोंडाने, वर्षा पाटील, विशाखा गेडाम, रुपाली गभने, जकीरा बानो, राजेश्री बन्सोड आदींसह वस्ती स्तर संघाच्या अध्यक्ष यांचा मोलाचा वाटा आहे.

  संदीप कांबळे कामठी

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145