Published On : Fri, Apr 23rd, 2021

ग्रामिण रुग्णालय पारशिवनी येथे २०अक्सिजन बेडची व्यवस्था करता येऊ शकते- गज्जु यादव

पारशिवनी– ऊर्जामंत्री तसेच नागपुर पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ना जि ग्रा महासचिव उदयसिहं उर्फ गज्जु यादव यांचे सोबत सोमवारी (दि. १९) पारशिवनी तालुक्यातील कोरोना स्थितीबद्दल माहिती जाणून घेतली. दरम्यान कॉंग्रेस नेते उदयसिंह ऊर्फ गज्जू यादव यांनी पारशिवनी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे 20 आकसीजन बेड ची व्यवस्था करण्याबाबत तसेच सामाजिक न्याय विभागाचे नवीन वस्तीगृह पॅच रोड व सिंचन विभागाचे विश्रामग्रह सावनेर रोड येथे केअर सेंटर सुरू करण्यात यावे असल्याची माहिती दिली.असेही गज्जु यादव यांनी यावेळी डॉः नितिन राऊत पालकमंत्र्यांना सांगितले.

तसेच अनुभवी डॉक्टरचा अभाव असून प्रतिनियुक्तीवर पाठविलेल्या डॉक्टरला परत बोलावून 20 खाटांचे ऑक्सिजन बेड सह कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी गज्जु यादव यांनी सोमवारी केली होती.पारशिवनी तालुकातील ग्रामीण रुग्णालय परिसरात नांन कोविहड रुग्णांना रुग्णालय परिसरात उपलब्ध असलेली इमारतीतील मध्ये स्थानांतरित करून ग्रामीण रुग्णालय पारशिवनी येथे 20 अक्सिजन बेडची व्यवस्था करता येऊ शकते यावर गांभीर्याने लक्ष केंद्रित करणे व चे व्यवस्था करण्यात यावी तसेच सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गीय विद्यार्थ्यांची वस्तीगृह पेच रोड पाराशिवनी येथील नवीन इमारत मध्ये तसेच सिंचन विभागात च्या सावनेर रोड येथील विश्रामगृहाच्या प्रशस्त इमारत उपलब्ध आहे

या इमारती चा उपयोग करून येथे कोविहङ केअर सेंटर सुरू करण्यात यावे अशी मागणी नागपूर जिल्हा ग्रामीण महासचिव उदयसिंह उर्फ गज्जु यादव यांनी केली २० ऑक्सिजन बेडसह कोविड सेंटर सुरू करण्याचीही मागणी यादव यांनी केली. बैठकीत पालकमंत्री डॉ. राऊत यांनी गंभीरतेने घेऊन जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना कारवाईचे निर्देश दिले.