Published On : Sat, Jun 6th, 2020

2 अवैध दारू तस्कर बाजास अटक, 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

जुनी कामठी पोलिसांची कारवाई


कामठी:-, एक्टिवा गाडीवर दारूची वाहतूक करीत असणाऱ्या दोन तरुणास सिनेस्टाईल पाठलाग करून गाडीसह अटक करून 55 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई सकाळी साडेनऊ वाजता सुमारास शुक्रवारी बाजार रुईगज क्रीडांगण परिसरात जुनी कामठी पोलिसांनी केली
जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अजगर अन्सारी मोहम्मद अखतर वय 19 व त्याचा मित्र सुजल गंगाधर साखरे वय 19 दोघेही राहणार मोमिनपुरा नागपूर हे होंडा एक्टिवा गाडी क्रमांक एम एच 40, ए वाय 2832 वर पायाजवळ एका बोरी मध्ये देशी दारू च्या दोन पेट्या भरून शुक्रवारी बाजारातून जात असताना जुनी कामठी पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांना हात दाखवून थांबवण्याचा इशारा केला

असता गाडी न थांबता ते सरळ रुईगज क्रीडांगणाच्या दिशेने पळून जाऊ लागले पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून गाडी थांबवून तपासणी केली असता त्यांच्या गाडीत देशी दारू च्या दोन पेट्या मिळून आल्या देशी दारू ची किंमत 5760 रुपये व गाडीची किंमत 50 हजार एकूण 55 हजार 760 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दोन्ही आरोपी विरोधात जुनी कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली वरील कारवाई पोलिस उपआयुक्त नीलोत्पल ,ठाणेदार देविदास कठाळे ,दुय्यम पोलीस निरीक्षक बलरामसिंग परदेशी यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक एस पुरभे, तगराज पिल्ले ,महेश कठाणे, पंकज मारसिंगे यांनी केली

संदीप कांबळे कामठी