
– तालुक्यात संक्रमितानची संख्या ग्रामीण सह शहर चीं पोहोचली 218 वर
रामटेक- अपेक्षे प्रमाणे कोरोणाची साखळी अध्यापही तुटू शकली नाही. रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे . आता रामटेक तालुक्यात पुन्हा एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. नगरधन येथे 2 आरोग्य सेवकव रामटेक येथील 2 पुरुष पोलीस तर 1 महिला पोलिस कर्मचारी याचे सह ग्रामीण व शहर मिळून ऐकून 16 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची शोधा शोध घेणे सुरू आहे. तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या 218 वर गेली आहे.
त्यापैकी स्वस्थ झालेल्यांना आइसोलेशन मधे ठेवण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार यानी दिली.तहसीलदार बाळासाहब मस्के , गट विकास अधिकारी बी. डबल्यू यावले,पोलीस निरीक्षक दिलिप ठाकूर , उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ प्रकाश उजगिरे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चेतन नाइकवार ,नगरधन प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैदकिया अधिकारी डॉ स्मिता काकडे ,
नगर परीषद रामटेक चे अधिकारी राजेश सव्वालाखे ,रोहीत भोईर हे उद्भवणाऱ्या परिस्थीती वर लक्ष ठेऊन आहेत.


