कन्हान : – जनता मेडिकल गणेश नगर कन्हान व्दारे समाज भवन हनुमान नगर येथे मानसिक आजार व इतर आजार तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबीराचा परिसरातील १४९ नागरिकांनी लाभ घेतला.
नुकताच समाज भवन हनुमान नगर कन्हान येथे मानसिक आजार व इतर आजार तपासणी व उपचार मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले. यात मानसिक रोगाशी संबंधित रोग मधुमेह, हुदयरोग तसेच मानसिक आजारात झोप न येणे, चिडचिड वाटणे, आत्महत्येचे विचार येणे आदी आजाराचा मोठा ताजबाग नागपुर येथील तञ डॉ दिपक अवचट, हुदयाला जन्मत:च असलेले छिद्र, लंग व व्हँयुल्युअर सर्जरी, बॉयपास तञ डॉ सतिश दास, दाताचे आजार डॉ श्रृती अवचट तसेच मधुमेह व इतर आजार डॉ रामामा फरहत, डॉ शाहीद अख्तर, डॉ एम एम सिध्दीकी आदीने संबंधित आजारांची तपासणी करून उपचारार्थ मार्गदर्शन केले.
या आरोग्य शिबीरांचे जनता मेडिकल गणेश नगर कन्हान व्दारे आयोजन केले असुन कन्हान व परिसरातील १४९ नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला. यशस्वीते करिता सर्व डॉक्टर व सहकारी चमु हयानी विशेष योगदान दिले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा अँड आशाताई पनीकर, सभापती गेंदलाल काठोके, नगरसेवक राजेश यादव, विनय यादव, संजय चहांदे , आशिफ रजा प्रामुख्याने उपस्थित होते.