Published On : Sun, Jul 21st, 2019

बेसा आरोग्य शिबिरात 1800 ़रुग्णांची तपासणी

Advertisement

श्री श्री फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम
सहा शिबिरांमधून 12 हजार रुग्णांना मिळाला लाभ

नागपूर: श्री श्री फाऊंडेशन कोराडी या सामाजिक संस्थेतर्फे बेसा येथे आयोजित आरोग्य शिबिरात आज 1800 रुग्णांची तपासणी करण्यात आली व आवश्यक त्या रुग्णांना मोफत औषधोपचार करण्यात आला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी जि.प. सदस्य रुपराव शिंगणे, शुभांगी गायधने, अजय बोढारे, सरपंच सुरेंद्र बानाईत, सरपंच नरेश भोयर, रामराज खडसे, सरपंच जितेंद्र चांदूरकर, श्री श्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संकेत बावनकुळे, डॉ. प्रीती मानमोडे उपस्थित होते.

आजच्या शिबिरात मधुमेहाची 340 रुग्णांची तपासणी, रक्ताची 377, जनरल मेडिसिन 108 रुग्णांची तपासणी, रक्तदोष 105 रुग्णांची तपासणी, सर्जरी करणे आवश्यक अशा 177 रुग्णांची तपासणी, हृदयरोग 37 रुग्ण, किडणीबाबत 25 जणांची तपासणी, कर्करोग 45 जणांची तपासणी, स्तन कर्करोग 111 महिला रुग्णांची तपासणी, 251 जणांची मेंदू, डोळ्यांची तपासणी करणार्‍या दोन चमूंनी सुमारे 320 जणांची तपासणी केली. सुनील फुडके यांच्या टीमने 111 जणांनी तर महात्मे आय हॉस्पिटलतर्फे 210 जणांची तपासणी केली.

डॉक्टरांच्या चमूमध्ये डॉ. मनीषा राजगिरे, डॉ. अमोल पाटील, डॉ. पराग देशमुख, डॉ. स्वाती वानीकर, डॉ. वृषाली नवलकर, डॉ. श्वेता ठाकरे, डॉ. गुंडावार, डॉ. वणीकर, डॉ. गुरु, डॉ. वर्घने, डॉ. कपिल देवतळे, डॉ. राहूल लामसोंगे, डॉ. पाटील, डॉ. हजारे, डॉ. संदीप, डॉ. देशमुख, डॉ. रघुवंशी, डॉ. भोयर, डॉ. गिल्लूरकर हॉस्पिटलची टीम आदींचा सहभाग होता.
शिबिर यशस्वी करण्यासाठी श्री श्री फाऊंडेशनतर्फे महेश बोंडे, अरुण सावरकर, हर्षल हिंगणीकर, विकास धारपुडे, प्रीतम लोहासारवा, बापूराव सोनवने, रोहित पंचबुध्दे, विनोद मोरे, सुजीत महाकाळकर, सचिन घोडे, कपिल गायधने आदींनी प्रयत्न केले.