Published On : Mon, Feb 1st, 2021

1617 बालकांना बेला येथे पोलिओचा डोस

बेला: राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत बेलाबेला प्राथमिक आरोग्य केंद्रात 1669 उद्दिष्टा पैकी 1617 बालकांना पोलिओचा डोस पाजण्यात आला व लसीकरण मोहीम यशस्वी करण्यात आली.

जि .प. सदस्य वंदनाताई बालपांडे यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे, आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील दडमल, डॉक्टर विकास ढोक गजानन मगर भगत गुटके जयश्री हेडाऊ मंगला मोहरले सपना पानसो कांचन उगेमुगे व इतर सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.