Published On : Tue, Jul 4th, 2017

विदर्भातील 16.51 लाख वीज ग्राहकांनी केली मोबाईल क्रमांकाची नोंद

Advertisement

Maha-vitran
नागपूर: महावितरणच्या नागपूरम प्रादेशिक कार्यालायांतर्गत असलेल्या विदर्भातील तब्बल 16 लाख 51 हजार 549 ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली असून महावितरण कडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या ग्राहकांना वीज देयकाची रक्कम, किती युनिटचा वापर झाला, खंडित वीज पुरवठा यासंदर्भातील माहिती एसएमएस च्या माध्यमातून मिळत आहे.

1 जून 2017 पासून 1 जुलै 2017 या एका महिन्यातच तब्बल 4 लाख 12 हजारापेक्षा अधिक ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली आहे. अद्यापही एकून ग्राहकांपैकी केवळ 34.97 टक्के ग्राहकांनी या सेवेचा लाभ घेतला असला तरी प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी मागिल महिन्याभरात याकडे विशेष लक्ष केंद्रीत केल्याने केवळ जून महिन्यात मोबाईल नोंदणी करणा-या वीज ग्राहकांच्या संख्येत 8.74 टक्क्यांनी घसघसित वाढ झाली आहे. वीज ग्राहकांच्या मोबाईल क्रमांक नोंदणीत नागपूर परिमंडलाने आघाडी घेतली आहे, यात नागपूर शहर मंडलातील 1 लाख 11 हजार 464 ग्राहकांनी, नागपूर ग्रामिण मंडलातील 1 लाख 49 हजार 228 तर वर्धा मंडलातील 2 लाख 9 हजार 666 ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे. तर चंद्रपूर परिमंडलातील चंद्रपूर मंडलातील 1 लाख 89 हजार 975, गडचिरोली मंडलातील 94 हज्जर 441 ग्राहकांनी गोंदीया परिमंडलांतर्गत असलेल्या गोंदीया मंडलातील 85 हज्जर 608 तर भंडारा मंडलातील 70 हजार 608 ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे.

महावितरणच्या अकोला परिमंडलांतर्गत असलेल्या अकोला मंडलातील 1 लाख 48 हजार 370 ग्राहकांनी, बुलढाणा मंडलातील 2 लाख 8 हजार 753 ग्राहकांनी तर वाशिम मंडलातील 47 हजार 447 ग्राहकांनी याचसोबत अमरावती परिमंडलांतर्गत असलेल्या अमरावती मंडलातील 2 लाख 11 हजार 81 ग्राहकांनी तर यवतमाळ मंडलातील 1 लाख 25 हजार 211 ग्राहकांनी महावितरणकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करीत महावितरणच्या एसएमएसच्या माध्यमातील सर्व सेवा मोबाईलवर मिळविणे सुरु केले आहे.

ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा महावितरणचा प्रयत्न असून एसएमएसद्वारे ग्राहकांना अनेक सुविधा उपलब्ध करूंन देण्यात येत आहेत. ग्राहकांनी महावितरणच्या कॉलसेंटर टोल फ्री क्र. १८००२००३४३५/१८००२३३३४३५/१९१२० येथे तसेच महावितरणचे मोबाईल अ‍ॅप वीज बिल भरणा केंद्र अथवा महावितरणचे संकेतस्थळं www.mahadiscom.in येथे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.