Published On : Tue, Oct 13th, 2020

नागपुरात १५ कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी केले निलंबित

नागपूर : कामचोर पोलिसांना पोलीस आयुक्तांनी दणका दिला आहे. सतत ड्युटीपासून गैरहजर राहणारे, ड्युटीवर अनियमित असणारे, वारंवार सीकलिव्ह घेऊन गैरहजर राहणाऱ्या १५ पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे.

हे कर्मचारी गैरहजर राहात असल्यामुळे त्यांच्या कामाचा भार इतरांवर येत होता. म्हणून अशा दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचं आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबन केले आहे.

सतत ड्युटीपासून गैरहजर राहणारे, या ड्युटीवर अनियमित असणाऱ्या पोलिसांना जोराचा झटका बसला आहे. हे कर्मचारी सतत अनुपस्थित राहत असल्यामुळे त्यांच्या कामाचा भार दुसऱ्या कर्मचाऱ्यांवर येत होता. म्हणून सतत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थित राहण्याच्या कारणांचा आढावा आयुक्तांनी घेतला. त्यानंतर आयुक्त अमितेशकुमार यांनी ही कारवाई केली आहे.