Published On : Tue, Jul 31st, 2018

१५ ऑगस्टला जमादार व स्वच्छता निरीक्षकांचाही सत्कार

Advertisement

नागपूर: स्मार्ट सिटी म्हणून उदयास येणाऱ्या आपल्या नागपूर शहराची स्वच्छ शहर म्हणून ओळख होत आहे. शहाराला विविध पुरस्कारांनीही गौरविण्यात येते. शहराला मिळणाऱ्या गौरवाचे संपूर्ण श्रेय सफाई कामगारांनाच जात आहे. शहराच्या स्वच्छतेत स्वच्छता कर्मचारी व ऐवजदार यांच्याप्रमाणेच जमादार व स्वच्छता निरीक्षकांचेही मौलिक योगदान आहे. त्यामुळे आता पुढे जमादार व स्वच्छता निरीक्षकांनाही गौरविण्यात येणार असून येत्या १५ ऑगस्टला सत्कार समारंभ घेण्यात येईल, अशी घोषणा उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केली.

शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त मंगळवारी (ता. ३१) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात गुणवंत सफाई कामगार व ऐवजदारांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आरोग्य समिती उपसभापती विजय चुटेले, नेहरुनगर झोन सभापती रिता मुळे, नगरसेविका स्नेहल बिहारे, संगीता गिऱ्हे, वर्षा ठाकरे, रूपा रॉय, नगरसेवक लखन येरावार, उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वचछता) डॉ. प्रदीप दासरवार, पशु वैद्यकीय अधिकारी गजेंद्र महल्ले, राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉइज असोसिएशनचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, राजेश हाथीबेड, सुदाम महाजन आदी उपस्थित होते. समारंभात दहाही झोनमधील ३० सफाई कामगार व २० ऐवजदारांना तुळशी रोप, शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तत्पूर्वी महापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह सर्व मान्यवरांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षि वाल्मिकी व भगवान सुदर्शन यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन केले.

Gold Rate
17 Jan 2026
Gold 24 KT ₹ 1,42,600/-
Gold 22 KT ₹ 1,32,600 /-
Silver/Kg ₹ 2,83,500/-
Platinum ₹ 60,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना उपमहापौर श्री. पार्डीकर म्हणाले, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हा गौरव आहे. महापालिकेमध्ये काम करणाऱ्या अस्थायी सफाई कर्मचाऱ्यांना स्थायी करणे शिवाय नवीन भरती करण्यासाठी मनपा प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे म्हणाले, शहराला सुदृढ ठेवण्यामध्ये सफाई कामगारांचे योगदान नेहमीच मोठे राहिले आहे. आज आपले नागपूर स्वच्छ दिसत आहे, त्याचे श्रेय सफाई कामगारांनाच जात आहे. अस्थाई कामगारांना स्थायी करण्याचा निर्णय घेण्यात यावा, असेही ते म्हणाले. स्वच्छता हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र त्याला नेहमी खालच्या स्तराचे समजले जाते. मात्र स्वच्छतेविना आपण जगूच शकत नाही, हे तेवढेच खरे आहे. यंदा नागपूर महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात राज्यात पहिल्या दहामध्ये आहे, हे यश पूर्णत: सफाई कर्मचाऱ्यांचे आहे. सफाई कर्मचाऱ्यांसाठी काय चांगले करता येईल, यासाठी मनपा सदैव प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे संचालन राजेश हाथीबेड यांनी केले. आभार झोनल अधिकारी राजेश गायकवाड यांनी मानले.

सत्कारमूर्ती गुणवंत सफाई कामगार

लक्ष्मीनगर झोन – आसाराम खोब्रागडे, राजू वाहने, सुमित्रा पथरोल, देवानंद कांबळे, हिराबाई मानवटकर. धरमपेठ झोन – ज्ञानी नानेटकर, गोपाल लाहोरी, कमला बालवे, लक्ष्मण निनावे, सुमित्रा महातो. हनुमाननगर झोन – पंजाब पिल्लेवान, राजेश्वर मांडवकर, मोहिनी बक्सरे, हिम्मत हटकेल, सुनिता चव्हाण. धंतोली झोन – मोहन बक्सरे, मुन्ना सकतेल, कवता समुंद्रे, विष्णू ठवरे, आशा अरखेल. नेहरूनगर झोन – धनराज पानतावणे, गोपीचंद गणवीर, गीता मेश्राम, पवन बालपांडे, सुनिता खरे. गांधीबाग झोन – माधव समुंद्रे, जयवंतराव येवले, संपती तांबे, राजकुमार बुरबुरे, सुनीता डोंगरवार. सतरंजीपुरा झोन – संतोष जाधव, यरोना शेट्टी, गिता महतो, चंद्रमणी गोंडाणे, फुलनबाई कोचे. लकडगंज झोन – प्रकाश ठवरे, बाळा बोरकर, संगीता शेट्टी, सुभाष काळे, मैनाबाई चिमणकर. आसीनगर झोन – सुनील पखिडडे, विनोद शेंदरे, ललीता धौंसेल, चरण नंदेश्वर, फुलनबाई डोये. मंगळवारी झोन – इंद्रसेन वैद्य, राजू समुंद्रे, रोशनी पांडे, राजेंद्र डकाहा, शिला चौधरी.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement