Published On : Mon, Feb 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरात गुंतवणुकीच्या आमिषाने 13.27 लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून दोघांना अटक

Advertisement

नागपूर : गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून तब्बल 13 लाख 27 हजार 376 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी नागपूर सायबर पोलिसांनी मोठी कारवाई करत इंदूर (मध्यप्रदेश) येथील दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे सायबर गुन्हेगारांच्या नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.

सायबर पोलीस ठाणे, नागपूर शहर येथे अपराध क्रमांक 103/2025 अंतर्गत भारतीय न्याय संहिता व माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल आहे. 18 नोव्हेंबर 2025 रोजी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना ‘ग्रोथ इंडिया रिसर्च इन्व्हेस्टमेंट कंपनी’चे अधिकारी असल्याचे भासवून आरोपींनी खोटे ई-मेल पाठवले. त्यानंतर गुंतवणुकीत मोठा नफा मिळेल असे सांगत विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली.

Gold Rate
Feb 9th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,400 /-
Gold 22 KT ₹ 1,46,400 /-
Silver/Kg ₹ 2,63,000 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या प्रकरणाचा तपास सुरू होताच सायबर पोलिसांनी आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन विशेष तपास पथक इंदूर येथे रवाना करण्यात आले. त्यानुसार ब्रिजेश नामदेवभाई सूर्यवंशी (वय 37) आणि दीपक सुभाषचंद्र अग्रवाल (वय 48) या दोघांना 7 फेब्रुवारी 2026 रोजी अटक करण्यात आली.

तपासात उघडकीस आले की, आरोपी दीपक अग्रवाल याने विविध व्यक्तींना बँक खाती उघडण्यास लावून त्यांची संपूर्ण कागदपत्रे स्वतःकडे ठेवली होती. या खात्यांद्वारे फिर्यादींची रक्कम वळती करून इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तिची विल्हेवाट लावण्यात आली. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, आतापर्यंत न्यायालयाच्या आदेशानुसार 5 लाख 96 हजार 712 रुपये इतकी रक्कम फिर्यादींच्या खात्यावर परत मिळवून देण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

हा संपूर्ण तपास पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल, सह पोलीस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, अति. पोलीस आयुक्त (गुन्हे) वसंत परदेशी आणि पोलीस उप आयुक्त (सायबर) लोहीत मतानी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. सध्या वपोनि बळीराम सुतार, पोउपनि विवेकानंद औटी व सायबर तपास पथक पुढील तपास करत आहे.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement