Published On : Mon, Feb 9th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील टिमकी–पाचपावलीत कॅसिनो जुगार अड्ड्यावर धाड; ४.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त

Advertisement

नागपूर: शहरातील टिमकी–पाचपावली परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कॅसिनो जुगार अड्ड्यावर तहसील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. इलेक्ट्रॉनिक कॅसिनो मशिन्सच्या माध्यमातून जुगार चालवणाऱ्या तीन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई ६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री उशिरा करण्यात आली.

रात्री सुमारे ११.२० वाजता तहसील पोलीस गस्ती पथकाला टिमकी परिसरातील रेल्वे फाटकाजवळ, विजय मेडिकल्स शेजारील गल्लीतील एका इमारतीच्या वरच्या मजल्यावर जुगार सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानंतर पंचांच्या उपस्थितीत पोलिसांनी छापा टाकला.
छाप्यात ‘फ्रंट लाईन’, ‘हॅलो विन’, ‘मास्टर’, ‘एक्सप्रेस बोनस’, ‘केझेड व्हील’, ‘टॉपर’ आणि ‘मिंट’ अशा विविध कॅसिनो गेम्सवर पैशांची हार–जीत सुरू असल्याचे उघड झाले. या प्रकरणात गौरव राजेश नन्हे (२३), अक्षय देविदास फुलझेले (२६) आणि रोहित श्रीकांत भोंगाडे (२३) यांना अटक करण्यात आली आहे.

Gold Rate
Feb 10th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,56,800/-
Gold 22 KT ₹ 1,45,800 /-
Silver/Kg ₹ 2,61,300 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पोलिसांनी ४ हजार रुपये रोख रक्कम, १७ कॅसिनो मशिन्स, मॉनिटर्स, प्रिंटर, स्कॅनर, सीपीयू, कीबोर्ड, तीन मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण ४ लाख ८३ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत जरीपटका येथील इजाज शेख (३२) याच्या मदतीने हा जुगार अड्डा चालवला जात असल्याचे समोर आले असून, तो सध्या फरार आहे.

या प्रकरणी तहसील पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कलम ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मेंढे व त्यांच्या पथकाने केली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement