Published On : Wed, Jun 17th, 2026
By Nagpur Today Nagpur News

राज्यातील १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; प्रशासनात मोठी फेरबदल

Advertisement

मुंबई : राज्य सरकारने मंगळवारी उशिरा १२ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत प्रशासनात महत्त्वपूर्ण फेरबदल केले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीनंतर या बदल्यांची घोषणा करण्यात आली. मुंबई, एमएमआरडीए, सिडको, एमआयडीसी तसेच विविध जिल्हा परिषदांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मुंबई महानगरपालिकेतील अतिरिक्त महानगर आयुक्त म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी जोशी यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) येथे अतिरिक्त महानगर आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी प्राजक्ता वर्मा यांच्याकडे मुंबई महापालिकेतील अतिरिक्त महानगर आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Gold Rate
Sept 17,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 51,500 /-
Gold 22 KT ₹ 1,40,500 /-
Silver/Kg ₹ 2,29,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची बदली करण्यात आली असून, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेलारसू यांनाही पदावरून हलविण्यात आले आहे. त्यांच्या जागी दीपेंद्रसिंग कुशवाह यांची एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. कादंबरी बलकवडे यांची उद्योग संचालनालयातील विकास आयुक्त (उद्योग) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालक तसेच आयुक्त (कुटुंब कल्याण) म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या जागी संजय काटकर यांच्याकडे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक आणि आयुक्त (कुटुंब कल्याण) पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.

Advertisement

जिल्हा परिषदांमध्येही बदल करण्यात आले आहेत. जेनिथ चंद्रा दोंथुला यांची गोंदिया जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे, तर अनय नवंदर यांच्याकडे अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तसेच डॉ. बी. सरवणन यांची किनवट (नांदेड) येथे प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) व सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. लाघिमा तिवारी यांची तळोदा (नंदुरबार) येथे प्रकल्प अधिकारी (आयटीडीपी) आणि सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे प्रशासनातील विविध विभागांमध्ये नव्या जबाबदाऱ्यांसह कामकाजाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.