Published On : Thu, Feb 26th, 2026
By Nagpur Today Nagpur News

नागपूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ४.१४ लाखांचा गांजा जप्त, एकाला अटक

Advertisement

नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत १२.६८ किलो गांजा जप्त केला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ४ लाख १४ हजार ६०० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

२४ फेब्रुवारी रोजी कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ विरोधी पथकाला (Anti-Narcotics Team) गोपनीय माहिती मिळाली होती की, नागपूर–उमरेड मार्गावरून गांजाची बेकायदेशीर वाहतूक होत आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचत गस्त वाढवली.

दरम्यान, लाल रंगाची मोठी बॅग घेऊन क्रमांक नसलेल्या दुचाकीवरून जाणारा एक संशयित व्यक्ती पोलिसांच्या नजरेस पडला. पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अल्प पाठलागानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आकाश युवराज पांचबई (वय ३०, रा. पिंपळगाव निपाणी, ता. पातूर, जि. भंडारा) असे आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातील लाल बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये १२.६८ किलो गांजा आढळून आला. चौकशीदरम्यान आरोपीने हा गांजा वितरणासाठी नेत असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Advertisement

या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे.यात १२.६८ किलो गांजा (किंमत अंदाजे ₹४,१३,६००)वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी एक मोबाईल फोन,जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ₹४,१४,६०० इतकी आहे.

या प्रकरणी आरोपीविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (NDPS Act) कलम २०(ब) व २२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीकडून या अमली पदार्थाच्या पुरवठा साखळीबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता असून पोलिस तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.