Advertisement
मुंबई: दहावीच्या विद्यार्थ्याचा बोर्ड परीक्षेच्या आदल्या रात्रीच हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऋतिक घडशी असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. ऋतिक घडशी हा दादर येथील शिशूविहार शाळेतील विद्यार्थी होता. आज इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर होता, मात्र पेपरपूर्वीच ऋतिकचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास ऋतिकला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर कुटुंबीयांनी त्याला केईएम हॉस्पिटलमध्ये नेले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.