Published On : Sun, Oct 10th, 2021

10 ॲाक्टोम्बर जागतिक बेघर दिन विशेष :- सफर-ए-मेट्रो

Advertisement

बेघर नागरिकांनी लुटला मेट्रो सफारीचा आनंद

नागपूर : नागपूर शहरात उघड्यावर वास्तव्य करणारे बेघर हे शहराचाच एक भाग आहेत, परिस्थितीने असे जीवन त्यांच्या नशिबी आले असले तरी आनंदी जीवन जगण्याचा अधिकार त्यांनाही आहे, म्हणून त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाने दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत शहरात सहा ठिकाणी बेघर निवारे सुरू केलेले आहे.

त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.

जागतिक बेघर दिनानिमित्त’ मनपा अतिरिक्त आयुक्त श्री दीपक मीना आणि उपायुक्त श्री राजेश भगत यांचे मार्गदर्शनात उपजीविका अभियान व्यवस्थापक श्री प्रमोद खोब्रागड़े, श्री विनय त्रिकोलवर, नूतन मोरे यांच्या सहकार्याने जागतिक बेघर दिनाच्या पूर्वसंध्येला सर्व सहाही बेघर निवाऱ्याचे बेघर लाभार्थी एकत्र येऊन झिरो माईल ते खापरी मेट्रो स्टेशन प्रवास केला. निवारा केंद्राच्या बाहेर निघून निसर्ग रम्य वातावरणातील मेट्रो सफर मरगळ घालवणारी ठरली.