Published On : Mon, Oct 5th, 2020

भंडारा जिल्ह्यात आज 106 रूग्णांना डिस्चार्ज

Advertisement

· 126 कोरोना पॉझिटिव्ह
·बरे झालेले रुग्ण 4112
·पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 5990
·क्रियाशील रुग्ण 1742
·आज 03 मृत्यू
·एकूण मृत्यू 136

भंडारा : जिल्ह्यात आज 106 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4112 झाली असून आज 126 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5990 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69 टक्के आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आज 883 व्यक्तींचा घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीत आले असून त्यापैकी 126 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 48 हजार 411 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 5990 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 57, साकोली 17, लाखांदूर 13, तुमसर 00, मोहाडी 08, पवनी 23 व लाखनी तालुक्यातील 11 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 4112 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 5990 झाली असून 1742 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 03 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 136 झाली आहे.

Advertisement

जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 3085, साकोली – 459, लाखांदुर- 267, तुमसर- 522, मोहाडी- 552, पवनी- 548 व लाखनी- 557 असे एकूण 5990 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 4112 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.27 टक्के एवढा आहे.

आज 04 ऑक्टोबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 89 व्यक्ती भरती असून 2237 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.