| | Contact: 8407908145 |
  Published On : Mon, May 11th, 2020

  1043 गरजू कुटुंबाना अन्नधान्य वितरण

  कामठी :-या पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला या समाजाला काही देणे असून हे त्यांचे आद्य कर्तव्य आहे या मानवतेच्या संकल्पनेतून ‘लिबर्टी क्लासेस, पे बॅक टू सोसायटी, व समता सैनिक दल कामठी तसेच समविचारी संघटनेच्या माध्यमातून सध्यस्थीतीत सुरू असलेल्या या वैश्विक महामारीच्या कोरोना विषाणूच्या कठीण परिस्थितीत 1043 गरजू कुटुंबाना अन्न धान्य वितरित करून त्यांची भूक भागविण्याची अनमोल कार्य करण्यात आले.

  या कार्यामुळे पे बॅक टू सोसायटी या संकल्पनेला खरे उतरले असून या कार्यात विस्मित मेश्राम, संदीप रामटेके, बबलू रामटेके, राहुल मानवटकर, शुभम बावंनगडे, वीरेंद्र मेश्राम, अभिजित मेश्राम, निलेश मेश्राम, सुगत रामटेके, विद्याताई भीमटे, धम्मदीप तिरपुडे, आरजू कांबळे, विनीत नागदेवें, अंशुल तांबे आदींनी मोलाची भूमिका साकारली

  संदीप कांबळे कामठी

  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145