Published On : Mon, May 11th, 2020

खर्चाला फाटा देत पार पडला आदर्श विवाह सोहळा

Advertisement

लॉकडाऊन काळात बिडगाव गावात बांधल्या लग्नगाठी

कामठी :-कोरोना व्हायरस ने सर्वत्र थैमान घातले आहे .लॉकडाऊंन मुळे सर्व व्यवहार ठप्प होऊन पडले आहेत .शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून या व्हायरस च्या संक्रमणाला पायबंद घालण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत .या परिस्थितीत संचारबंदी मुळे सार्वजनिक उत्सव तसेच इतर समारंभावर बंदी आहे

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यामुळे यापूर्वी ठरलेले विवाह सोहळे कार्यक्रम अडचणीत आले आहेत .परंतु कामठी तालुक्यातील बिडगाव गावातील नागेश्वर नगर येथे ग्रा प सरपंच , उपसरपंच तसेच पोलिस कर्मचऱ्यासह प्रतिष्ठित नागरिकांच्या पुढाकाराने सोशल डिस्टनसिंग व प्रशासनाच्या निर्देशांचे पूर्णपणे पालन करीत 5 मे ला बिडगाव गावात पार पडलेल्या विवाह सोहळ्याची लग्नगाठ सध्याच्या नववर वधूसाठी आदर्श ठरली आहे.

5 मे रोजी कामठी तालुक्यातील बिडगाव येथील नागेश्वर नगर रहिवासी आकांक्षा रहांगडाले ह्या मुलीचा विवाह वर्धा येथील राहुल चौधरी नामक तरुणाशी अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्या वऱ्हाडींच्या उपस्थितीत सामाजिक दूरीचा नियम पाळून पार पडला.

Advertisement

करोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने करण्यात आलेला हा आदर्श विवाह गावात कौतुकाचा विषय ठरला आहे. या प्रसंगी बिडगाव ग्रा प सरपंच निकेश कातुरे,उपसरपंच संतोष तिजारे, पारडी पोलीस स्टेशन चे दोन पोलीस कर्मचारी, अजय बिसेन, डॉ शरणागत, संजय गौतम, गणेश पटले, सुरेंद्र पटले, बलदेव साहू, वघाल भगत आदी उपस्थित होते. यावेळी वधू पक्षाकडून अल्पोहार वाटप करण्यात आला.

संदीप कांबळे कामठी

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.