Published On : Mon, Jun 26th, 2017

नागपूरच्या वोक्‌हार्ट हॉस्पिटल्समध्ये शंभरावी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया


नागपूर :
वोक्‌हार्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूरमधील मूत्रपिंड प्रत्यारोपण टीमने काल शंभरावी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीरीतीने करुन आणखी मैलाचा दगड गाठला आणि १०० प्रत्यारोपणे पूर्ण करणारे विदर्भातील पहि्ले हॉस्पिटल ठरले आहे.

मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याच्या १ वर्षांनंतर वोक्‌हार्ट हॉस्पिटल्स नागपूरमधील मूत्रपिंड प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांचा जगण्याचा दर ९५% आहे; हा दर आंतरराष्ट्रीय स्तरवारील जगण्याच्या ६०% ते ६५% या दरापेक्षा बराच जास्त आहे.

वोक्‌हार्ट हॉस्पिटल्समध्ये ५ वर्षांपूर्वी पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. सध्या वोक्‌हार्ट हॉस्पिटल्समध्ये दर महिन्यात दोन ते तीन प्रत्यारोपणे केली जातात. या प्रवासात हॉस्पिटलने आतापर्यंत १६ मृत व्यक्तींमधील मूत्रपिंड यशस्वीरीत्या प्रत्यारोपित केली आहेत. वोक्‌हार्ट हॉस्पिटलमध्ये या प्रदेशातील, मृत व्यक्तीतील पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण ४ एप्रिल २०१३ रोजी करण्यात आले होते.

“संपूर्ण टीमसाठी हे अतिशय महत्त्वाचे यश आणि अभिमानाचा क्षण आहे. कोणत्याही क्षेत्रात शतक करणे हे मोठेच यश आहे”, असे डॉ. संजय कोलते, कंसल्टंट मूत्रपिंड प्रत्यारोपण, वोक्‌हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले “मला हा विचार करताना अभिमान वाटतो की १०० परोपकारी लोक पुढे आले आणि मूत्रपिंड निष्फल्तेच्या रुग्णांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी आपल्या शरीरातील एका भागाचे दान केले.”

डॉ. समीर चौबे, शहरातील प्रतिष्ठित नेफ्रॉलॉजिस्ट म्हणाले, “आम्ही पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण केले तेव्हापासूनचा हा प्रवास अतिशय संस्मरणीय आहे. १०० या आकड्यापर्यंत पोहोचणे हे वोक्‌हार्ट हॉस्पिटल्ससाठी आणि आमच्या टीमसाठी मोठी उपलब्धी आहे.”

वर्धा येथील ६३ वर्षीय पुरुष रुग्णात १०० वे मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्यात आले. प्रत्यारोपणासाठी मूत्रपिंड शहरातील दुसर्‍या रुग्णालयातून आणण्यात आले व मृत व्यक्तीतील मूत्रपिंडाचे हे सोळावे प्रत्यारोपण ठरले. येथे ही सुद्धा नोंद घेणे समर्पक आहे की मृत व्यक्तीतील पहिले मूत्रपिंड प्रत्यारोपण करणारे आणि मूत्रपिंडाची वाहतूक करुन प्रत्यारोपण करणारे वोक्‌हार्ट हॉस्पिटल या प्रदेशातील पहिले हॉस्पिटल आहे.

डॉ. सूर्यश्री पांडे कंसल्टंट मूत्रपिंड प्रत्यारोपण, वोक्‌हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर म्हणाल्या, “१०० मूतपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्याच्या या प्रवासात आम्ही अनेक आव्हानांना तोंड दिले. टीम वर्क, डॉक्टर्स आणि अन्य कर्मचार्‍यांचे समर्पण यामुळेच आम्ही हे यश मिळवू शकलो”.

“आम्हाला मिळालेली फलनिष्पत्ती ही देशातील सर्वोत्तमांपैकी आहे, त्यामुळे आमच्यासाठी हे फक्त आकड्यांविषयी नाही तर या कार्यक्रमाद्वारे आम्ही रुग्णांना सातत्याने प्रदान करत असलेल्या सेवेविषयीही आहे,” असे के. सुजाथा, सेंटर हेड वोक्‌हार्ट हॉस्पिटल्स, नागपूर म्हणाल्या. “ एक मोठा प्रवास करत आज आम्ही इथवर आलो आहोत आणि आजचा दिवस हा पदवी मिळाल्याचा दिवस आहे. आम्ही आता पुढील वाटचालीसाठी सज्ज आहोत.”

त्या पुढे म्हणाल्या, “ डॉ. संजय कोलते, मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण टीम, डॉ. समीर चौबे आणि डॉ. सूर्यश्री पांडे, कंसल्टंट नेफ्रॉलॉजिस्ट, डॉ. हजारे आणि डॉ. हाजरा, भूलतज्ज्ञांची टीम ज्यामध्ये डॉ. राजकुमार तितरमार, डॉ. सरिता जोगळेकर, डॉ. अवंतिका जयस्वाल, डॉ. राजुरकर आणि डॉ. प्रविण ठाकूर यांचा समावेश आहे, यांचे अभिनंदन करते.” त्यांनी, सहायक जिजो यांची संपूर्ण क्लिनिकल सपोर्ट टीम, नर्सिंग स्टाफच्या सविता पांडे, माधुरी, सुरेख आणि शुभांगी, टेक्निषियन्स संजय आणि जीवन, वोक्‌हार्टमध्ये प्रत्यारोपण कार्यक्रमाचे समन्वय करणारे डॉ. राजेश गाडे, वैद्यकीय प्रशासन प्रमुखयांचेही अभिनंदन केले आहे.

वोक्‌हार्ट हॉस्पिटल नागपूर हे मल्टिस्पेशालिती हॉस्पिटल असून ब्रेन व स्पाईन सर्जरी, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी व ऑर्थोपेडिक्स, डायालिसिस व किडनी ट्रान्सप्लांट, कार्डियॉलॉजी व कार्डियॅक सर्जरी, सामान्य शस्त्रक्रिया, कर्करोग सेवा, आपत्कालीन सेवा आणि क्रिटिकल केयर ट्रीटमेंट यामध्ये सुपर स्पेशलाइज्ड आहे. अधिक माहितीसाठी ०७१२६६२४४४४, ०७१२६६२४१०० या क्रमांकांवर संपर्क साधता येईल.