Published On : Mon, Dec 20th, 2021

शुक्रवारी १००० प्लास्टिक पतंगे जप्त

Advertisement

३ प्रतिष्ठानांवर उपद्रव शोध पथकाची कारवाई

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी (ता. १७ डिसेंबर) रोजी ३ प्रतिष्ठानांवर कारवाई करुन रु. ३५,००० चा दंड वसूल केला. पथकाने ४६ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली. पथकाने १० झोन मधील ५५ पतंग दुकानांची तपासणी करुन १००० प्लास्टिक पतंग ५ दुकानातून धरमपेठ झोनमध्ये जप्त केली. तसेच रु. १०,०००/- चा दंड ही लावण्यात आला.

मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली झोन शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.