मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार एमएमआरडीएचे आयुक्त यु.पी.एस. मदान यांच्याकडे वित्त विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाची सूत्रे सोपविण्यात आली असून एमएमआरडीएचे नवे आयुक्त म्हणून आर. ए. राजीव यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
एकूण दहा प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आज बदल्या करण्यात आल्या. लोकेश चंद्रा यांच्याकडे सिडकोच्या संचालकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. एम. एन. केरकेट्टा यांची खादी ग्रामउद्योगाचे सीईओ, एस. आर. दौंड यांची सामान्य प्रशासन विभाग, राजीव कुमार मित्तल यांची वित्त विभागाचे प्रधान सचिव (व्यय), पराग जैन यांची एमएसटीसीच्या संचालकपदी, संतोष कुमार यांची एमएसएसआयडीसीच्या संचालकपदी, पी. वेलारासू यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी तर भूषण गगराणी यांची मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
