Published On : Tue, Oct 1st, 2019

मनपाच्या सेवेतून २४ अधिकारी व कर्मचारी निवृत्त

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये सेवा देणारे २४ अधिकारी व कर्मचारी सोमवारी (ता.३०) सेवेतून निवृत्त झाले. मनपातर्फे सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांचा मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला.

यावेळी आयोजित कार्यक्रमाला निगम अधीक्षक (साप्रवि) मदन सुभेदार, सहायक अधीक्षक मनोज कर्णिक, सहायक अधीक्षक (पेन्शन) मुकेश साकोरे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, डोमाजी भडंग आदी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांचा हस्ते शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप आणि धनादेश प्रदान करुन सन्मान करण्यात आला.


कार्यक्रमाचे संचालन सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस यांनी केले. यावेळी जनसंपर्क विभागातील सहायक दिलीप तांदळे यांच्यासह विविध विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांमध्ये अग्निशमन विभागातील सब ऑफीसर व्ही.आर.वंजारी, आरोग्य विभागातील ॲलोपॅथीक कम्पाउंडर आर.के.मेंढे, आरोग्य विभागातील लिडींग फायरमन आय.जी.गिरी, आरोग्य विभागातील लॉरी ड्रायव्हर डी.एस.तांबे, जलप्रदाय विभागातील उच्च श्रेणी लिपीक पी.जी.सोनक, आरोग्य विभागातील उच्च श्रेणी लिपीक एम.व्ही.दारकोंडे, स्थानिक संस्था कर विभागातील मोहरीर अनील गणेर, बाजार विभागातील कनिष्ठ निरीक्षक ए.बी.नारनवरे, कर व कर आकारणी विभागातील कनिष्ठ लिपीक सुभाष हटवार, कर संग्राहक विजय वैद्य, प्रकाश विभागातील हवालदार एस.एस.सतभैय्या, शिक्षण विभागातील एल.टी.डी.मा. विद्या मुनीश्वर, सहायक शिक्षिका शिला रफेल फ्रान्सीस, कर व कर आकारणी विभागातील चपराशी अशोक पाठक, आरोग्य विभागातील चपराशी दिपक तांबोळी, शिक्षण विभागातील चपराशी सतीश जबलपुरे, कर व कर आकारणी विभागातील खलाशी प्रेमनाथ फाये, आरोग्य विभागातील सहायक कामगार मनोज बैरीसाल, सहायक कामगार मीरा तुरर्केल, सहायक कामगार भीमराव सुखदेवे, सहायक कामगार किशोर शेंदरर्नीकर, सहायक कामगार कौशल्या समुंद्रे, सहायक कामगार मनोरमा हजारे, कुसुम सोनटक्के यांचा समावेश आहे.