Published On : Tue, Oct 3rd, 2017

प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी दटके समितीची बैठक

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना गती देण्याकरिता महापौरांनी नेमलेल्या प्रवीण दटके समितीची बैठक मंगळवारी (ता.३) महापौर कक्षात पार पडली.

महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, समितीचे अध्यक्ष माजी महापौर प्रवीण दटके, आमंत्रित सदस्य स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, सदस्य व स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती संजय बंगाले, नगरसेवक पिंटू झलके, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्दिकी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे, नगररचना सहायक संचालक सुप्रिया थूल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, स्थावर अधिकारी आर. एस. भुते उपस्थित होते.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महानगरपालिकेचे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित असणारे प्रकल्प महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात. नागनदी प्रकल्प, बिक दवाखाना, ऑरेंज स्ट्रीट हे प्रकल्प महत्त्वाकांक्षी असल्याचे सांगत समितीने अधिकाऱ्यांकडून या प्रकल्पांची माहिती घेतली. ह्या प्रकल्पांतील अडचणी तातडीने दूर करून मार्गी लावण्यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. समितीची पुढील बैठक ५ ऑक्टोबर रोजी होणार असून त्यात बीओटी आणि पीपीपी वर आधारीत प्रकल्पांची माहिती घेऊन चर्चा करण्यात येणार आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement