Published On : Tue, Jun 30th, 2020

ओंकार नगर, भरतवाडी, लकडगंज १ व २ जलकुंभ गुरुवारी राहणार बाधित

Advertisement

शटडाऊन दरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा नाही.

नागपूर: नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी लकडगंज झोन येथे ३ आंतरजोडण्यांच्या कामासाठी एक व हनुमान नगर झोन येथे ओंकार नगर जलकुंभाच्या आऊटलेटवर फ्लो मीटर बसविण्याच्या कामांसाठी एक असे दोन शटडाऊन्स २ जुलै (गुरुवार) रोजी घेण्याचे ठरविले आहे.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हनुमान नगर झोन येथे मनपा-OCW यांनी ओंकार नगर जलकुंभाच्या आउटलेट वर फ्लो मीटर बसविण्याचे ठरविले आहे. यासाठी २४ तासांचे शटडाऊन २ जुलै रोजी घेण्यात येत आहे. शटडाऊन २ जुलै (गुरुवार) रोजी सकाळी १० वाजतापासून ३ जुलै (शुक्रवार) सकाळी १० वाजेपर्यंत राहील.

ओंकार नगर जलकुंभाच्या २४ तासांच्या शटडाऊन दरम्यान खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील:

Advertisement

ओंकार नगर, अभय नगर,. जयवंत नगर, फुलमती लेआऊट, धाडीवाल लेआऊट, साई नगर, रामटेके नगर, रहाटे नगर, रमा नगर, सद्भावना नगर, स्वराज नगर, विणकर वसाहत, विणकर कॉलोनी, जुना मानेवाडा, दिवान लेआऊट, स्वामी नगर, वनराई नगर, श्रीहरी नगर १, २ व ३.

याच दिवशी लकडगंज झोन येथे मनपा-OCW ३००x१५० व १५०x१५० अशा दोन आंतरजोडण्यांची कामे हाती घेणार असून त्याच बरोबर १५०० मिमी व्यासाचा व्हॉल्व संघर्ष नगर येथे १२ तासांच्या शटडाऊन दद्र्म्यान बसविणार आहेत. या कामामुळे भरतवाडी (देशपांडे लेआऊट) व लकडगंज १,२ जलकुंभाच्या क्षेत्रातील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.

या कामासाठी १२ तासांचे शटडाऊन आवश्यक असून ते २ जुलै रोजी सकाळी १० ते रात्री १ दरम्यान घेण्यात येईल.

खालील भागांचा पाणीपुरवठा या दरम्यान बाधित राहील:

भरतवाडी (देशपांडे लेआऊट): प्रजापती नगर, देशपांडे लेआऊट, महाबलीपुरम, संघर्ष नगर, सदाशिव नगर, कामाक्षी नगर, उमिया कॉलोनी, जुनी वस्ती वाठोडा, पँथर नगर, हिवरी कोटा परिसर, वेद भूमी

लकडगंज १ व २: पूर्व वर्धमान नगर, पडोळे नगर, पँथर नगर, हिवरी नगर, शिवाजी सोसायटी, EWS कॉलोनी, LIG, MIG कॉलोनी, पडोळे नगर स्लम, हिवरी नगर संपूर्ण परिसर, वर्धमान नगर

मनपा व OCW यांनी उपरोक्त भागांतील नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी कि, शटडाऊन दरम्यान टँकरद्वारे पाणीपुरवठा देखील बंद राहील.

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges

Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.