नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात भरदिवसा धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. हैदरी चौकातील मोबाईल दुकानासमोर उभी असलेल्या अॅक्टिव्हाच्या डिकीतून अज्ञात चोरट्यांनी 69 हजार 500 रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भवानी मंदिर परिसरातील रहिवासी 39 वर्षीय शेखर चुनीलाल बर्मन यांनी आपल्या नातेवाईकाच्या बँक खात्यातून 69 हजार 500 रुपये काढले होते. ही रक्कम त्यांनी अॅक्टिव्हाच्या डिकीत ठेवली आणि हैदरी चौकातील बॉम्बे मोबाईल दुकानात मोबाईल खरेदीसाठी गेले.
काही वेळानंतर ते डिकीतून पैसे काढण्यासाठी परत आले असता, बॅगमधील संपूर्ण रक्कम गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ नातेवाईकाला माहिती देत जुनी कामठी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता, एक संशयित अॅक्टिव्हाची डिकी उघडून पैसे काढताना स्पष्टपणे दिसून आला. त्यानंतर तो दुसऱ्या साथीदारासह दुचाकीवर बसून घटनास्थळावरून पसार झाल्याचेही फुटेजमध्ये आढळून आले आहे.
या घटनेनंतर जुनी कामठी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून सीसीटीव्हीच्या आधारे दोन्ही आरोपींचा शोध सुरू केला आहे.
भरदिवसा गजबजलेल्या बाजारपेठेत घडलेल्या या चोरीच्या घटनेमुळे परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Nagpur Crime: मानकापुर में ₹6.64 लाख की चोरी का खुलासा! #NagpurNews #MankapurNews...
Nagpur: 11 साल की बच्ची से Instagram पर अश्लील चैट का आरोप...
नागपुर के अंबाझरी तालाब में कूदी 16 साल की किशोरी #NagpurNews #AmbazhariLake...
नागपुर में किराना दुकान लूट का खुलासा! चाकू की नोक पर लूट...
अमरावती में नवजात मौतों पर विजय वडेट्टीवार का सरकार पर हमला! #MaharashtraNews...
जालना में भांजी को अपशब्द कहने पर युवक की हत्या! #Crime #MaharashtraNews...





